अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून अभिनेत्री कंगना राणौत आणि राज्य सरकारमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. कंगनानं ठाकरे सरकारसह मुंबई पोलिसांवर सातत्यानं निशाणा साधला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत परतू नये यासाठी धमकी दिली होती, असा खळबळजनक आरोप कंगनानं केला होता. त्याला राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. पण, तिनं राऊत यांच्यावर टीका करताना मुंबईचा अपमान करणारं विधान केलं होतं आणि त्यावरून ती ट्रोल झाली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेनंही कंगनाला स्पष्ट शब्दात सुनावलं.
...म्हणजे मुंबई आणि इंडस्ट्रीवर माझं प्रेम नाही असा अर्थ होतो का?; कंगनाचा 'रोखठोक' सवाल
संजय राऊतांनी शिवसेनेचं खरं रूप दाखवलं; कंगना Vs. सेना सामन्यात बबिता फोगाटची उडी
संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावादेखील तिनं केला आहे. 'मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?,' असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता.
त्याला सुबोध भावेनं उत्तर दिलं. ''ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन जरूर करा.जिथे तुम्हाला काम मिळालं, ओळख मिळाली त्या शहराचा आणि राज्याचा मान ठेवा. आमचं प्रेम आहे आणि आम्हाला अभिमान आहे मुंबईचा!,'' अशा शब्दांत भावेनं तिला खडेबोल सुनावले.
सुबोध भावेच्या घरातही कोरोनाचा शिरकाव!मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेच्या घरातही कोरोनाने शिरकाव केला आहे. ही माहिती खुद्द त्यानेच सोशल मीडियावर दिली आहे. त्याच्यासोबत पत्नी आणि एका मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. 31 ऑगस्टला सुबोध भावे यांनी ट्विटरवर सांगितले की, मी,मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वतःला क्वारंटाइन करून घेतले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने उपचार घेत आहोत. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. गणपती बाप्पा मोरया.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
नाइट रायडर्स संघातला 48 वर्षांचा तरुण; जाँटी ऱ्होड्स स्टाईल घेतली कॅच, पाहा व्हिडीओ
संजय राऊतांनी शिवसेनेचं खरं रूप दाखवलं; कंगना Vs. सेना सामन्यात बबिता फोगाटची उडी
IPL 2020 : आयपीएलमधील कोरोना सदस्यांचा आकडा 14 झाला, आणखी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
IPL 2020 : सुरेश रैनाच्या माघारीनंतर उपकर्णधार कोण? CSKनं उत्तरातून दिले स्पष्ट संकेत