VIDEO: "मराठी गया तेल लगाने...", सुरक्षारक्षकाने दाखवला माज; मनसेनं काढला कानाखाली आवाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 13:01 IST2025-04-01T12:47:22+5:302025-04-01T13:01:51+5:30

Marathi Language Controversy: मराठीच्या मुद्द्यावरुन मुंबईत पुन्हा एकदा एकानं वाद घातल्याची घटना समोर आली आहे. पवई येथे आयटी कंपनीच्या सुरक्षारक्षकाने एका मराठी व्यक्तीसोबत वाद घातला.

Marathi Gaya Tel Lene L&T Security Guard Invites MNS Style Lesson In Mumbai Powai After Controversial | VIDEO: "मराठी गया तेल लगाने...", सुरक्षारक्षकाने दाखवला माज; मनसेनं काढला कानाखाली आवाज!

VIDEO: "मराठी गया तेल लगाने...", सुरक्षारक्षकाने दाखवला माज; मनसेनं काढला कानाखाली आवाज!

Marathi Language Controversy:मराठीच्या मुद्द्यावरुन मुंबईत पुन्हा एकदा एकानं वाद घातल्याची घटना समोर आली आहे. पवई येथे आयटी कंपनीच्या सुरक्षारक्षकाने एका मराठी व्यक्तीसोबत वाद घातला. मराठीत बोलणार नाही म्हणत 'मराठी गया तेल लगाने' अशी अरेरावी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट आयटी कंपनीचं कार्यालय गाठलं आणि संबंधित सुरक्षारक्षकाला जाब विचारला. 

मराठी भाषेचा अपमान सहन करणार नाही, असा पवित्रा घेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षारक्षकाच्या कानशिलात लगावली. त्यासोबतच त्याला माफी मागयला लावली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही नुकतंच पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात मराठीच्या मुद्द्यावरुन आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळाला. "महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठीचा सन्मान झालाच पाहिजे. प्रत्येक राज्याची भाषा असते तशी महाराष्ट्राच्या मराठी भाषेचा योग्य सन्मान होत नसेल तर कानफाटीतच बसणार", असा रोखठोक इशारा राज यांनी दिला होता. 

व्हायरल झालेला व्हिडिओ- 


वर्सोव्यातही डी-मार्टच्या कर्मचाऱ्याची अरेरावी
वर्सोवा येथील डी-मार्टच्या कर्मचाऱ्यानंही एका मराठी कर्मचाऱ्यासोबत वाद घालताना 'मराठी बोलणार नाही, काय करशील?', असं म्हणत अरेरावी केली होती. त्यानंतर स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनी डी-मार्टच्या कर्मचाऱ्याला जाब विचारत धडा शिकवला होता. तसंच माफीही मागायला लावली होती. 

सुरक्षारक्षकाला मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप-

एअरटेलच्या कर्मचाऱ्यानंही घातलेला वाद
कांदिवलीत एअरटेल कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्रातील महिला कर्मचाऱ्यानं मराठी महत्त्वाची नाही, बोलणार नाही, असं म्हणत मराठी तरुणासोबत वाद घातला होता. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेत एअरटेलचं कार्यालय गाठलं होतं. महाराष्ट्रात काम करताना कर्मचाऱ्यांना मराठी बोलता आलीच पाहिजे, असा इशारा दिला होता.

Web Title: Marathi Gaya Tel Lene L&T Security Guard Invites MNS Style Lesson In Mumbai Powai After Controversial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.