Join us

ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांच्या निधनाने ‘मराठी हायकू पोरकी झाली’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 2:58 AM

ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांच्या निधनामुळे मराठी साहित्य प्रयोगशील कवयित्रीला मुकले असून मराठी हायकू पोरकी झाली, अशा भावना साहित्य वर्तुळातून व्यक्त होत आहेत.

मुंबई : ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांच्या निधनामुळे मराठी साहित्य प्रयोगशील कवयित्रीला मुकले असून मराठी हायकू पोरकी झाली, अशा भावना साहित्य वर्तुळातून व्यक्त होत आहेत. शिरीष पै यांनी सुरुवातीच्या काळात वडील प्र. के. अत्रे यांच्या सोबतीने ‘मराठा’, ‘नवयुग’ या वर्तमानपत्रांच्या तसेच ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळी’च्या कामात सहभाग घेतला. साहित्याबरोबरच सामाजिक कार्यातील त्यांचा सहभाग देखील लक्षणीय होता. या गुणी पत्रकार, कवयित्री व लेखिकेच्या जाण्याने मराठी साहित्यविश्वाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे, अशा शब्दांत अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.मराठी साहित्य समृद्ध करणारी लेखिका आपण गमावली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. आचार्य अत्रे यांच्या पत्रकारिता आणि साहित्याचा वारसा त्यांनी समर्थपणे चालविला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.पै यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाने हरहुन्नरी साहित्यिक गमावला. स्वत:ची स्वतंत्र लेखनशैली निर्माण केली होती. मराठी साहित्यात ‘हायकू’ हा अभिनव काव्यप्रकार रुजवून तो वाढविण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी म्हटले आहे. अत्रे कुटुंबीयांचा सासवडशी असलेला दुवा निखळला, असे सासवडच्या आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी सांगितले. प्रतिष्ठानच्या उभारणीमध्ये शिरीषतार्इंचे मार्गदर्शन मिळाले. अत्रे यांचे दुर्मिळ फोटो त्यांनी अत्रे प्रतिष्ठानला अर्पण केले. कलादालन उभारण्यासाठी त्यांनी अर्थसहाय्यही केले. शिरीष पै यांचे ऋण प्रतिष्ठान विसरणार नाही, असेही कोलते यांनी म्हटले आहे. या वेळी गायक अशोक हांडे, रामदास भटकळ, डिंपल प्रकाशनाचे अशोक मुळये, अचला जोशी, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, अभय वर्तक, पद्मजा फेणाणी जोगळेकर आदींनी शिरीष पै यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.अनुवाद : इंग्रजी : अखेरचे पान, माझे नाव आराम हिंदी : निवडक ओशो साहित्य : पथप्रदीप सूर्याच्या दिशेने उड्डाण, पाण्यात बुडी घे खोल, मनापलीकडे, अंतर्यात्रा, ज्योतिष आणि आध्यात्म, गीता- ८ वा अध्यायव्यक्तिचित्रसंग्रह : पपा, वडिलांचे सेवेसी, प्रियजन, वडिलांना आठवून पपा तुम्ही म्हणजे तुम्हीच, प्रतिभावंत ध्यानयोगी ओशोकादंबरी : लालन बैरागी, हेही दिवस जातीलनाटक : कळी एकदा फुलली होती, हा खेळ सावल्यांचा, झपाटलेलीबालवाङ्मय : बागेतील गोष्टी(कथा), आईची गाणी (कविता)पै यांच्यानिधनाने मराठी साहित्यविश्वाने हरहुन्नरी साहित्यिक गमावला. स्वत:ची स्वतंत्र लेखनशैली निर्माण केली होती. मराठी साहित्यात ‘हायकू’ हा अभिनव काव्यप्रकार रुजवून तो वाढविण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. साहित्याबरोबरच सामाजिक कार्यातील त्यांचा सहभाग देखील लक्षणीय होता. या गुणी पत्रकार, कवयित्री व लेखिकेच्या जाण्याने मराठी साहित्यविश्वाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे, अशा शब्दांत अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.पारितोषिके व पुरस्कारमहाराष्ट्र राज्य शासनगद्य : वडिलांच्या सेवेशी, मी माझे मलापद्य : एका पावसाळ््यात, ऋतुचित्रमहाराष्ट्र साहित्य परिषदहायकू (काव्यसंग्रह)प्रदीर्घ साहित्य सेवा : ज्योत्स्ना देवधर यांचा शरचंद्र पुरस्कार (महाराष्ट्र साहित्य परिषद)प्रदीर्घ साहित्य सेवा : अक्षरधन पुरस्कारकथा संग्रह : चैत्रपालवी, सुखस्वप्न, मयूरपंख, मंगळसूत्र, कांचनहार, संधिप्रकाश, लव्हली, लग्न, जुनून, दु:खाचे रंग, कांचनगंगा, खडकचाफा, हापूसचे आंबे.काव्यसंग्रह : कस्तुरी, एकतारी, एका पावसाळ््यात, विराग, गायवाट, चंद्र मावळताना, ऋतुचित्र, ध्रुवा, हायकू, हायकूंचे दिवस, माझे हायकू, मनातले हायकू, पुन्हा हायकू, नवे हायकू, अंधारयात्रा, चारच ओळी, शततारका, जीवनगाथा, निवडक कविता: फुलांची भाषा.ललित लेखसंग्रह: आतला आवाज, आजचा दिवस, मैलोन्मैल, कुणीच नाही, मी माझे मला, अनुभवांती, उद्गारचिन्हे, खायच्या गोष्टी, आकाशगंगा, जुने ते सोने, निवडक ललित लेखसंग्रह : रानातले दिवस, हाती शिल्लक, माझे जीवनगाणे, मुके सोबतीनिवडक कथासंग्रह : हृदयरंग, प्रणयगंध, रानपाखरे, भवसागर, प्रेमरोग, विस्मयकारी, ऊनसावली, कमलपत्रकाव्यातील ‘शिरीष’ हरपलाशिरीष पै या आचार्य अत्रेंच्या मोठ्या कन्या होत्या. मात्र हा गर्व त्यांच्या वागण्या-बोलण्यात कधीही नव्हता. वडिलांविषयी अतिशय लोकप्रिय पुस्तके त्यांनी लिहिली. त्यात त्यांच्या संपूर्ण आठवणी आहेत. त्यांची आर्थिक स्थिती बरी नसताना त्यांचे पुस्तक लिहावे यासाठी प्रयत्न करणाºया शिरीष पै अनोख्या वाटतात. कारण एका कवीला दुसºया कवीचा आदर असणे ही दुर्मीळ गोष्ट झाली आहे. कुठल्याही कवींना त्यांनी विन्मुख पाठवले नाही, नाराज केले नाही. पै वडिलांचा स्मृतिदिन अतिशय उत्साहात साजरा करायच्या. एका पुरस्कार सोहळ्यात आचार्य अत्रेंची आठवण सांगायला बोलावले तेव्हा त्यांनी मलाही बक्षीस दिले होते. त्या वेळी त्यांना म्हणाले, मला कशाला? तेव्हा शिरीष पै म्हणाल्या, कोणत्याही कवीला मी विन्मुख पाठवत नाही. प्रत्येकाबद्दल कौतुकाने बोलायच्या. प्रत्येकाचा आदर करायच्या. तो गोडवा होता, जो निघून गेला. तो बळ देणारा आशीर्वाद, तो मायेचा हात निघून गेला. काव्यातील ‘शिरीष’ हरपला.- विजया वाड, ज्येष्ठ साहित्यिका