महाराष्ट्रातच मराठीची उपेक्षा सुरू आहे - धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 03:45 PM2018-02-27T15:45:32+5:302018-02-27T15:45:32+5:30

मराठी भाषा दिन साजरा करीत असताना आज मराठी भाषा विभागाला पूर्णवेळ सचिव नाही, भाषा विभागातील 40 % पदे रिक्त आहेत. मंत्रालयातील सचिव,आय. ए. एस., आय. पी. एस. अधिकारी मराठीत टिपणे इंग्रजीत टाकतात.

Marathi is neglected in Maharashtra - Dhananjay Munde | महाराष्ट्रातच मराठीची उपेक्षा सुरू आहे - धनंजय मुंडे

महाराष्ट्रातच मराठीची उपेक्षा सुरू आहे - धनंजय मुंडे

Next

मुंबई - मराठी भाषा दिन साजरा करीत असताना आज मराठी भाषा विभागाला पूर्णवेळ सचिव नाही, भाषा विभागातील 40 % पदे रिक्त आहेत. मंत्रालयातील सचिव,आय. ए. एस., आय. पी. एस. अधिकारी मराठीत टिपणे इंग्रजीत टाकतात. मुख्यमंत्री अनेक कार्यक्रमात हिंदी, इंग्रजी भाषेत बोलतात. मराठीची उपेक्षा सुरू असल्याची खंत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानपरिषदेत सभापती रामराजे निंबाळकर यांनी मांडलेल्या ठरावावर बोलतांना त्यांनी राज्यात होत असलेल्या मराठी भाषेची उपेक्षा("पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी`, आपुल्या घरात हाल सोसते मराठी, हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी") या कवी सुरेश भट यांच्या या कवितेतील चार ओळी वाचून दाखत मांडली.

तावडेंच्या वक्तव्यावर घेतला जोरदार आक्षेप
काल राज्यपालांच्या अभिभाषणावेळी त्यांचे भाषण गुजराती मधून अनुवादित होत असल्याचा मुद्दा धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला होता , त्यावर  शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तुम्हाला सर्वत्र धनाजी संताजी दिसतात असा शब्दप्रयोग केला होता, त्यावर मराठीची बाजू घेतली म्हणून तुम्हाला आम्ही मुघल वाटतो का असा पलटवार करत तावडे यांचे शब्द रेकॉर्ड वरून काढून टाकण्याची मागणी केली.

Web Title: Marathi is neglected in Maharashtra - Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.