मराठीप्रेमी पालक महासंमेलन ऑनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:17 AM2020-11-26T04:17:27+5:302020-11-26T04:17:27+5:30

मुंबई : मराठी अभ्यास केंद्राच्या मराठीप्रेमी पालक महासंघाच्या वतीने गेल्या ३ वर्षांपासून मराठीप्रेमी पालक महासंमेलनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ...

Marathi Premi Palak Mahasammelan online | मराठीप्रेमी पालक महासंमेलन ऑनलाइन

मराठीप्रेमी पालक महासंमेलन ऑनलाइन

googlenewsNext

मुंबई : मराठी अभ्यास केंद्राच्या मराठीप्रेमी पालक महासंघाच्या वतीने गेल्या ३ वर्षांपासून मराठीप्रेमी पालक महासंमेलनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी कोरोनामुळे हे संमेलन १८ ते २१ डिसेंबर दरम्यान ऑनलाइन हाेईल. यानिमित्ताने वक्तृत्व, निबंध, चित्रकला, व मीम्स अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या शेवटच्या दिवशी स्पर्धांचे निकाल घोषित करण्यात येतील.

..............................................

‘नवे दृष्टिकोन, नवे शिक्षण’ या विषयावर ऑनलाइन व्याख्यानमाला

मुंबई : कोरोनामुळे विद्यार्थी उत्कर्ष मंडळाची ६३वी विवेकानंद व्याख्यानमाला रात्री ८ वाजता ऑनलाइन होईल. २५ नोव्हेंबर रोजी ‘नवे दृष्टिकोन नवे शिक्षण’ या विषयावर एमकेसीएलचे मुख्य सल्लागार डॉ. विवेक सावंत मार्गदर्शन करतील. २७ नोव्हेंबरपर्यंत ही व्याख्यानमाला असेल.

..............................................

Web Title: Marathi Premi Palak Mahasammelan online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.