Join us

मराठी रंगभूमी ही आमची आई - गवाणकर

By admin | Published: February 28, 2016 2:03 AM

महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या महाकवी कालिदास नाट्यमंदिर नूतनीकरण कामातून रंगभूमीला व्यासपीठ मिळणार आहे. मराठी रंगभूमी ही आमची आई आहे.

मुंबई : महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या महाकवी कालिदास नाट्यमंदिर नूतनीकरण कामातून रंगभूमीला व्यासपीठ मिळणार आहे. मराठी रंगभूमी ही आमची आई आहे. ती अधिकाधिक वृद्धिंगत करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन अ. भा. मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी केले.महापालिका व बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाकवी कालिदास नाट्यमंदिर नूतनीकरण कामाचे भूमिपूजन गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते शनिवारी झाले. या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. गवाणकर म्हणाले, महाकवी कालिदास नाट्यमंदिर नूतनीकरण कामाचे भूमिपूजन करताना मला अतिशय आनंद होत आहे. महापौर स्नेहल आंबेकर म्हणाल्या की, नाट्यमंदिराच्या नूतनीकरणासाठी कोणतीही बाब कमी पडू देणार नाही. साहित्य, कला, शिक्षण, महिला आरोग्य, स्वच्छता इत्यादी कामांत महापालिका मोठ्या स्वरूपात काम करीत आहे. मराठी साहित्य क्षेत्राला व कलेला वाव तसेच व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात महापालिका प्रयत्नशील आहे. (प्रतिनिधी)