मराठी भाषेला 'हे' शब्द स्वा. सावरकरांनी दिलेत!... अवश्य वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 12:44 PM2018-05-28T12:44:20+5:302018-05-28T12:46:14+5:30

इतर भाषेतले शब्द वापरल्यानं, भाषा संकरामुळे भाषा समृद्ध होते, असा एक विचार सातत्याने ऐकायला मिळतो. तो सावरकरांना मान्य नव्हता, पटत नव्हता.

marathi words given by v d savarkar | मराठी भाषेला 'हे' शब्द स्वा. सावरकरांनी दिलेत!... अवश्य वाचा

मराठी भाषेला 'हे' शब्द स्वा. सावरकरांनी दिलेत!... अवश्य वाचा

googlenewsNext

परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी। 
माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपु नका।। 
भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे। 
गुलाम भाषिक होऊनि अपुल्या प्रगतीचे शिर कापु नका ।। 

कविवर्य वि. वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या 'स्वातंत्र्यदेवीची विनवणी' कवितेतील या ओळी. मराठी माणसाला विचार करायला लावणाऱ्या. 'यू नो' अशीच वाक्याची सुरुवात करणाऱ्या, 'हिंग्लिश मराठी' बोलणाऱ्या तरुण पिढीला जागं करणाऱ्या. मराठीचं प्रेम, अभिमान बाळगण्याची विनंती करणाऱ्या. 

भाषाप्रेम, भाषाशुद्धी या विषयांचा विचार करताना, एक नाव प्रकर्षाने आणि आदराने घ्यायलाच हवं. ते म्हणजे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं. सावरकर हे फर्डे वक्ते होते. भाषेवरचं - खरं तर भाषांवरचं प्रभुत्व आणि ओघवती वक्तृत्वशैली या जोरावर त्यांनी अनेक सभा गाजवल्या, अभिजात साहित्य लिहिलं. मराठी बोलताना मराठीच शब्द वापरण्याबाबत आग्रही असलेल्या सावरकरांनी मराठी भाषेला शेकडो शब्द दिलेत. इतर भाषेतले शब्द वापरल्यानं, भाषा संकरामुळे भाषा समृद्ध होते, असा एक विचार सातत्याने ऐकायला मिळतो. तो सावरकरांना मान्य नव्हता, पटत नव्हता. त्यामुळे अरबी, फारशी भाषेतून मराठीत आलेल्या शब्दांना, अनेक इंग्रजी शब्दांना त्यांनी मराठी प्रतिशब्द दिले. त्यातले अनेक शब्द आपण रोज वापरतो. या भेटीबद्दल आपण सावरकरांचे ऋणी राहायला हवं. 

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १३५व्या जयंतीनिमित्त, मराठी भाषाशुद्धी आणि भाषासमृद्धीच्या चळवळीतून मराठी भाषेला मिळालेल्या काही अमूल्य शब्दांची ही ओळख. यातले काही शब्द सावकरांनी स्वतः निर्माण केलेत, तर काही नव्याने प्रचारात आणलेत... 
   

शेम : धिक्कार, धिक धिक
रिपोर्ट : अहवाल
रिपोर्टर : प्रतिवेदक
झिंदाबाद : ... की जय, जय हो, अमर हो
खाते : विभाग
महसूल : राजस्व
अहमदाबाद : कर्णावती
अलाहाबाद : प्रयाग
अरबी समुद्र : पश्चिमसमुद्र, सिंधुसागर
अक्कल : बुद्धी, मती, प्रज्ञा
अजिबात : मुळीच, अगदी, आमूलात
अर्ज : आवेदन
एरवी : अन्यथा, नाहीतर, नहून
इमारत : बांधकाम, घर, भवन, सदन
तारीख : दिनांक
नंबर : क्रमांक
कर्ज : ऋण
गरीब : दीन, सालस, बापडा
कॉश्च्युम : वेशभूषा 
डायरेक्टर : दिग्दर्शक
सिनेमा : चित्रपट
इन्टर्व्हल : मध्यंतर
हजर : उपस्थित
रिपोर्ट : प्रतिवृत्त
म्युन्सिपाल्टी : नगरपालिका
कॉर्पोरेशन : महापालिका
मेयर : महापौर
सुपरवायझर : पर्यवेक्षक 
गुन्हा : अपराध, पाप
चष्मा : उपनेत्र
चेहरा : मुद्रा
जबरी संभोग : बलात्कार
अर्जंट : त्वर्य/त्वरित
ट्रस्ट : निक्षेप, न्यास 
ट्रस्टी : विश्वस्त
कोरम : गणसंख्या
कॉलम : स्तंभ
किंमत : मूल्य
फी : शुल्क
शहीद : हुतात्मा
कायदा : निर्बंध
खानेसुमारी : शिरगणती
खास अंक : विशेषांक
फाऊन्टनपेन : झरणी
रेडिओ : नभोवाणी
टेलिव्हिजन : दूरदर्शन
टेलिफोन : दूरध्वनी
लाउड स्पीकर : ध्वनिक्षेपक
असेम्ब्ली : विधिमंडळ
बजेट : अर्थसंकल्प
ग्राउंड : क्रीडांगण
प्रिन्सिपॉल : प्राचार्य
प्रिन्सिपॉल : मुख्याध्यापक
प्रोफेसर : प्राध्यापक
एक्झामिनर : परीक्षक
सिसफायर : शस्त्रसंधी
पोस्ट : टपाल
मॉर्गेट : तारण
परेड : संचलन
लिडरशीप : नेतृत्व
रिटायर : सेवानिवृत्त
पगार : वेतन
डायरी : दैनंदिनी 
तयार : सिद्ध, पूर्ण, सज्ज 
दर्या :  नदी, समुद्र
दिलगिरी : दुःख, पश्चात्ताप
नापास : अनुत्तीर्ण, असंमत
पार्लमेंट : संसद, लोकसभा
पोलीस : आरक्षक

Web Title: marathi words given by v d savarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.