Join us

मराठी भाषेला 'हे' शब्द स्वा. सावरकरांनी दिलेत!... अवश्य वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 12:44 PM

इतर भाषेतले शब्द वापरल्यानं, भाषा संकरामुळे भाषा समृद्ध होते, असा एक विचार सातत्याने ऐकायला मिळतो. तो सावरकरांना मान्य नव्हता, पटत नव्हता.

परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी। माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपु नका।। भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे। गुलाम भाषिक होऊनि अपुल्या प्रगतीचे शिर कापु नका ।। 

कविवर्य वि. वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या 'स्वातंत्र्यदेवीची विनवणी' कवितेतील या ओळी. मराठी माणसाला विचार करायला लावणाऱ्या. 'यू नो' अशीच वाक्याची सुरुवात करणाऱ्या, 'हिंग्लिश मराठी' बोलणाऱ्या तरुण पिढीला जागं करणाऱ्या. मराठीचं प्रेम, अभिमान बाळगण्याची विनंती करणाऱ्या. 

भाषाप्रेम, भाषाशुद्धी या विषयांचा विचार करताना, एक नाव प्रकर्षाने आणि आदराने घ्यायलाच हवं. ते म्हणजे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं. सावरकर हे फर्डे वक्ते होते. भाषेवरचं - खरं तर भाषांवरचं प्रभुत्व आणि ओघवती वक्तृत्वशैली या जोरावर त्यांनी अनेक सभा गाजवल्या, अभिजात साहित्य लिहिलं. मराठी बोलताना मराठीच शब्द वापरण्याबाबत आग्रही असलेल्या सावरकरांनी मराठी भाषेला शेकडो शब्द दिलेत. इतर भाषेतले शब्द वापरल्यानं, भाषा संकरामुळे भाषा समृद्ध होते, असा एक विचार सातत्याने ऐकायला मिळतो. तो सावरकरांना मान्य नव्हता, पटत नव्हता. त्यामुळे अरबी, फारशी भाषेतून मराठीत आलेल्या शब्दांना, अनेक इंग्रजी शब्दांना त्यांनी मराठी प्रतिशब्द दिले. त्यातले अनेक शब्द आपण रोज वापरतो. या भेटीबद्दल आपण सावरकरांचे ऋणी राहायला हवं. 

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १३५व्या जयंतीनिमित्त, मराठी भाषाशुद्धी आणि भाषासमृद्धीच्या चळवळीतून मराठी भाषेला मिळालेल्या काही अमूल्य शब्दांची ही ओळख. यातले काही शब्द सावकरांनी स्वतः निर्माण केलेत, तर काही नव्याने प्रचारात आणलेत...    

शेम : धिक्कार, धिक धिकरिपोर्ट : अहवालरिपोर्टर : प्रतिवेदकझिंदाबाद : ... की जय, जय हो, अमर होखाते : विभागमहसूल : राजस्वअहमदाबाद : कर्णावतीअलाहाबाद : प्रयागअरबी समुद्र : पश्चिमसमुद्र, सिंधुसागरअक्कल : बुद्धी, मती, प्रज्ञाअजिबात : मुळीच, अगदी, आमूलातअर्ज : आवेदनएरवी : अन्यथा, नाहीतर, नहूनइमारत : बांधकाम, घर, भवन, सदनतारीख : दिनांकनंबर : क्रमांककर्ज : ऋणगरीब : दीन, सालस, बापडाकॉश्च्युम : वेशभूषा डायरेक्टर : दिग्दर्शकसिनेमा : चित्रपटइन्टर्व्हल : मध्यंतरहजर : उपस्थितरिपोर्ट : प्रतिवृत्तम्युन्सिपाल्टी : नगरपालिकाकॉर्पोरेशन : महापालिकामेयर : महापौरसुपरवायझर : पर्यवेक्षक गुन्हा : अपराध, पापचष्मा : उपनेत्रचेहरा : मुद्राजबरी संभोग : बलात्कारअर्जंट : त्वर्य/त्वरितट्रस्ट : निक्षेप, न्यास ट्रस्टी : विश्वस्तकोरम : गणसंख्याकॉलम : स्तंभकिंमत : मूल्यफी : शुल्कशहीद : हुतात्माकायदा : निर्बंधखानेसुमारी : शिरगणतीखास अंक : विशेषांकफाऊन्टनपेन : झरणीरेडिओ : नभोवाणीटेलिव्हिजन : दूरदर्शनटेलिफोन : दूरध्वनीलाउड स्पीकर : ध्वनिक्षेपकअसेम्ब्ली : विधिमंडळबजेट : अर्थसंकल्पग्राउंड : क्रीडांगणप्रिन्सिपॉल : प्राचार्यप्रिन्सिपॉल : मुख्याध्यापकप्रोफेसर : प्राध्यापकएक्झामिनर : परीक्षकसिसफायर : शस्त्रसंधीपोस्ट : टपालमॉर्गेट : तारणपरेड : संचलनलिडरशीप : नेतृत्वरिटायर : सेवानिवृत्तपगार : वेतनडायरी : दैनंदिनी तयार : सिद्ध, पूर्ण, सज्ज दर्या :  नदी, समुद्रदिलगिरी : दुःख, पश्चात्तापनापास : अनुत्तीर्ण, असंमतपार्लमेंट : संसद, लोकसभापोलीस : आरक्षक

टॅग्स :साहित्य