मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठी माणसांची आणि भाषेची गळचेपी केली जात असल्याचे प्रकार समोर आले होते. मराठी माणसाला नोकरी नाकारण्याची जाहिरात आली होती. त्यानंतर धारावीच्या ९० फूट रोडवर मराठी बोलणार नाही असं म्हणणाऱ्या एका पानवाल्याला मराठी युवकांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.
लोकमतचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर या घटनेचे पडसाद उमटले. ऊर्जा छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला जाब विचारला. मी मराठी भाषेचा अपमान केला असून माझ्याकडून चूक झाली असून मला माफ करावं. मी मराठी भाषा शिकेन असं या पानटपरी चालवणाऱ्याकडून वदवून घेतले
पाहा व्हिडिओ
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळी स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी लोकमत प्रतिनिधी हरिता पुराणिक या दक्षिण मध्य मुंबईतील धारावी परिसरात गेल्या होत्या. त्यावेळी मराठी भाषेत प्रश्न विचारताना अचानक तिथे पान टपरी चालवणाऱ्या व्यक्तीनं हिंदी मै बात करो, बेवखूफ मत बनाओ, समझने मै आयेगा तो बोलेगा अशा अर्विभावात उत्तर दिली होती. मराठीचा आग्रह धरणाऱ्या लोकमत प्रतिनिधींशी वाद घातला.