मुंबई : कमाल तापमानाचा पारा दिवसागणिक वाढतच असून, ३० मार्च रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येईल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला. एकीकडे तापमानात वाढ नोंदविण्यात येत असतानाच दुसरीकडे मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी तर विदर्भात याच दिवशी पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.शुक्रवारी अकोला येथे सर्वाधिक ४३.२ अंश सेल्सिय एवढ्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. दरम्यान, मुंबईच्या कमाल तापमानात घट नोंदविण्यात येत असली तरी उन्हाचा तडाखा मात्र कायम आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. तर मुंबईचे कमाल तापमान ३३.१ अंश एवढे नोंदवण्यात आले. दरम्यान, शनिवारसह रविवारी मुंबई, आसपासच्या परिसरातील कमाल, किमान तापमान अनुक्रमे ३४ आणि २४ अंशाच्या आसपास राहील.विदर्भात पावसाची शक्यता३० मार्च : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटांसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता.३१ मार्च : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.१-२ एप्रिल : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.राज्यातील शहरांचे शुक्रवारचे कमाल तापमानअहमदनगर ४२.६अकोला ४३.२अमरावती ४२.६औरंगाबाद ४१.२बीड ४१.५जळगाव ४२.0जेऊर ४१.0मालेगाव ४२.८मुंबई ३३.१नागपूर ४१.२नांदेड ४१.0नाशिक ४०.0उस्मानाबाद ४०.५परभणी ४२.१पुणे ४०.४सोलापूर ४२.२वर्धा ४२.0यवतमाळ ४१.५अंश सेल्सिअसमध्ये