उत्तरेकडील वाऱ्यांमुळे मार्चही थंड पडला! महिन्याच्या सुरुवातीलाही थंडी कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 09:42 AM2024-03-07T09:42:33+5:302024-03-07T09:45:53+5:30
उन्हाळ्याची चाहूल देणाऱ्या मार्च महिन्याच्या सुरुवातीलाही थंडी कायम आहे.
मुंबई : उन्हाळ्याची चाहूल देणाऱ्या मार्च महिन्याच्या सुरुवातीलाही थंडी कायम आहे. ४ आणि ५ मार्चला मुंबईचे किमान तापमान १७ ते १८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले, तर दिवसा उन्हाचे चटके बसत असून, ते सहन होत नाहीत. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. दिवस आणि रात्रीमधील तापमानाच्या या कमालीच्या फरकामुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे आता मुंबईच्या कमाल व किमान तापमानात सरासरी चार अंशांची वाढ होईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला असून, वाढत्या उन्हाने मुंबईकरांना आणखी घाम फुटणार आहे.किमान तापमान १७ ते १८ अंश सेल्सिअस
...यामुळे तापमानात घसरण
१) उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे तापमानात घसरण झाली.
२) रविवारी कमाल तापमानात आठ अंशांची घट होत ते २८.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
३) १२ वर्षांनंतर मार्च महिन्यात कमाल तापमान एवढ्या मोठ्या संख्येने खाली आले होते.
४) यापूर्वी २ मार्च २०१२ रोजी २७.५ एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली होती.
५) ९ मार्च २००६ रोजी २७.३ कमाल तापमानाची नोंद झाली होती. मार्चमधील हा आतापर्यंतचा सर्वात थंड दिवस आहे. या दिवशी मुंबईत गारा किंचित पडल्या होत्या.