सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा; लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायद्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 12:06 PM2023-01-29T12:06:41+5:302023-01-29T12:10:43+5:30

या मोर्चात अनेक हिंदुत्ववादी संघटना तसेच भाजपच्या नेत्यांसह शिंदे गटाचे नेते सामील झाले आहेत.

march of the Sakal Hindu Samaj in Mumbai; Demand for love jihad and anti-conversion laws | सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा; लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायद्याची मागणी

फोटो - सुशील कदम

googlenewsNext

मुंबई : सकल हिंदू समाजाकडून मुंबईत हिंदू जन आक्रोश मोर्चाला (Hindu Jan Aakrosh Morcha) सुरुवात झाली आहे. दादरच्या शिवाजी पार्कपासून ते कामगार मैदानापर्यंत मोर्चा असणार आहे. लव्ह जिहाद बाबत सकल हिंदू सामाजार्फात हिंदू जनआक्रेश मोर्चा काढण्यात येत आहे. दादरच्या शिवाजी पार्कमधून सकाळी १० वाजता या मोर्चाला सुरुवाती झाली आहे. या मोर्चात अनेक हिंदुत्ववादी संघटना तसेच भाजपच्या नेत्यांसह शिंदे गटाचे नेते सामील झाले आहेत.

लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा, श्रद्धा वालकर प्रकरणी आरोपी आफताबला जन्मठेपेची शिक्षा मिळावी, लव्ह जिहाद कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून शिवाजी पार्क येथून मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात लव जिहादमध्ये अडकलेल्या मुलींचे कुटुंब आणि ज्यांना फसवण्यात आलेलं आहे, अशा काही पीडिताही सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या मोर्चाचे नेतृत्व महिला करताना दिसून येत आहेत. मोठ्या संख्येनं महिला या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. तसेच, या मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांची संख्या वाढताना दिसत आहे. हा मोर्चा पुढे प्रभादेवीपर्यंत काढण्यात येणार आहे. त्या ठिकाणी एक सभा देखील होणार आहे. जो हिंदू हित का काम करेगा, वही देश पे राज करेगा, गर्व से कहो हम हिंदू है, अशा घोषणा देण्यात येत आहे. 

दरम्यान, श्रद्धा वालकर हत्येमुळे संपूर्ण देश हादरुन गेला. अशात देशात लव्ह जिहादचे प्रकार वाढत आहेत. श्रद्धा हत्याकांडनंतर देखील अशा काही घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे धर्मांतर कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणी सकल हिंदू समाजामार्फत केली जात आहे. आज सकल हिंदू समाजाकडून मुंबईत काढण्यात येणाऱ्या या हिंदू जन आक्रोश मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. 

Web Title: march of the Sakal Hindu Samaj in Mumbai; Demand for love jihad and anti-conversion laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई