अवघ्या बारा तासांत मारेक-याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 03:07 AM2017-08-01T03:07:20+5:302017-08-01T03:07:23+5:30

आरे परिसरात एका ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह सोमवारी सकाळी आढळला. या महिलेची हत्या झाल्याचे उघड झाल्यानंतर आरे पोलिसांनी या प्रकरणी खुनाच्या गुन्ह्याची नोंद करत

Marek arrested in just 12 hours | अवघ्या बारा तासांत मारेक-याला अटक

अवघ्या बारा तासांत मारेक-याला अटक

Next

मुंबई : आरे परिसरात एका ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह सोमवारी सकाळी आढळला. या महिलेची हत्या झाल्याचे उघड झाल्यानंतर आरे पोलिसांनी या प्रकरणी खुनाच्या गुन्ह्याची नोंद करत अवघ्या १२ तासांत तिच्या मारेकºयांसह चौघांच्या मुसक्या आवळल्या. सर्व आरोपी सुरक्षारक्षक आहेत.
सतेंद्र सिंग, रामबाबू सिंग, अनिलकुमार सिंग आणि रोहितकुमार सिंग अशी अटक आरोपींची नावे आहेत. ते मूळचे बिहारचे असून, एमआयडीसीमध्ये ‘आॅप्शन प्राईमो’ या कंपनीत सुरक्षारक्षकाचे काम करतात. तर मयत महिला शारजाबाई खोतकर (४५) ही हाउसकिपिंगचे काम करत होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खोतकर हिची सतेंद्रसोबत मैत्री होती. त्यानुसार ते दोघे एकमेकांच्या संपर्कात होते, अशी माहिती खोतकरच्या कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर)वरून आरे पोलिसांच्या हाती लागली.
त्यानुसार त्यांनी सतेंद्रला ताब्यात घेऊन त्याला पोलिसी खाक्या दाखविला. तेव्हा त्यानेच खोतकरची हत्या एमआयडीसीतील एका गोडाऊनमध्ये केली आणि इतर सहकाºयांच्या मदतीने तिचा मृतदेह आरेमध्ये आणून टाकल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी अवघ्या १२ तासांत हे प्रकरण सोडविले.
सोमवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास गवत कापण्यासाठी गेलेल्या एका गावकºयाने खोतकरचा मृतदेह पहिला. त्याने आरे पोलिसांना याबाबत माहिती दिल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले.

Web Title: Marek arrested in just 12 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.