Join us

घरांसाठी गिरणी कामगारांचा ‘वर्षा’वर हल्लाबोल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 6:47 AM

वर्षा निवासस्थानाला घेराव घालत गिरणी कामगारांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई : आपल्या हक्काच्या घरांसाठी आक्रमक झालेल्या गिरणी कामगारांनी बुधवारी मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा बंगल्यावर धडक दिली. गिरणी कामगार कृती संघटनेने गनिमी काव्याने केलेल्या या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत २६ डिसेंबरला बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.

वर्षा निवासस्थानाला घेराव घालत गिरणी कामगारांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नाबाबत सरकार उदासीन असून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतरही कोणतीही चर्चा होत नाही. म्हणूनच हल्लाबोल करत घेराव घातल्याची माहिती गोविंदराव मोहिते यांनी दिली. मोहिते म्हणाले की, या आंदोलनात गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर, जयप्रकाश भिलारे आणि इतर नेत्यांचा समावेश होता. वर्षा निवासस्थानी आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. हा मोका साधून गिरणी कामगार नेत्यांनी आंदोलन छेडले. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना, कामगार नेत्यांसह वर्षा निवासस्थानाशेजारच्या महादेव जानकर यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी बसविण्यात आले. त्यानंतर वर्षा बंगल्यावर शिष्टमंडळाची चर्चा झाली. या चर्चेत १ लाख ७५ हजार कामगारांना घरे देण्याचा निश्चित कार्यक्रम जाहीर करण्याची मागणी कृती समितीने केली. त्यावर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शासनाच्या वतीने मध्यस्थी केली.लाड यांनी येत्या २६ तारखेला मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर सायंकाळी ४ वाजता मुख्यमंत्री संबंधित अधिकाºयांसह कामगार नेत्यांची बैठक घेतील, असे आश्वासन दिले. त्यावर दत्ता इस्वलकर यांनी घरांचा प्रश्न मार्गी लावण्याचा मुद्दा उचलून धरला. तर २०१० ला पहिली लॉटरी काढल्यानंतर वर्षभरात १ हजार १०० घरे मिळाली, मग १ लाख ६५ हजार घरे मिळायला किती वर्षे लागतील, असा सवाल गोविंदराव मोहिते यांनी केला. तरी सरकारने त्वरित कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणीही मोहिते यांनी केली आहे.‘...तर रस्त्यावर उतरू’च्घराच्या प्रश्नावर अनेक आंदोलने छेडण्यात आल्यानंतरही आश्वासनापलीकडे काहीच घडलेले नाही. एमएमआरडीएची ८ हजार घरे बांधून तयार असून बॉम्बे डार्इंग, श्रीनिवास या गिरण्यांची ४ हजार घरे बांधून तयार आहेत. पण त्यांची लॉटरी काढण्यात आलेली नाही.च्परिणामी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत प्रश्न मार्गी लागला नाही, तर कामगार तीव्र आंदोलनासाठी रस्त्यावर उतरतील, असा इशारा कृतीसमितीने दिला आहे.

टॅग्स :मुंबईदेवेंद्र फडणवीस