Join us

मेरिटाइम बोर्डाला मिळणार स्वत:च्या मालकीची इमारत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 2:12 AM

राज्यातील २ मोठी बंदरे व ४८ लहान बंदरांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड या संस्थेला स्वत:च्या मालकीचे मुख्यालय असलेली सुसज्ज इमारत मिळणार आहे. वांद्रे कुर्ला संकुलात या इमारतीची उभारणी करण्यात येणार आहे.

- खलील गिरकरमुंबई : राज्यातील २ मोठी बंदरे व ४८ लहान बंदरांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड या संस्थेला स्वत:च्या मालकीचे मुख्यालय असलेली सुसज्ज इमारत मिळणार आहे. वांद्रे कुर्ला संकुलात या इमारतीची उभारणी करण्यात येणार आहे.मेरिटाइम बोर्डाला मुख्यालय उभारण्यासाठी राज्य सरकारतर्फे वांद्रे-कुर्ला संकुलात गेल्या काही वर्षांपूर्वी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, त्याचे काम अद्याप प्रलंबित होते, पण आता प्राथमिक पातळीवरील काम सुरू झाले आहे. मुख्यालयासाठी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली १२ मजली भव्य इमारत उभारण्यात येणार असून, त्यामध्ये मेरिटाइम बोर्डाची सर्व कार्यालये हलविण्यात येतील. सध्या बॅलार्ड इस्टेट येथील इमारतीत बोर्डाचे कार्यालय आहे. या इमारतीच्या वापरासाठी बोर्डाला भाडे भरावे लागते. त्यामुळे मोठी रक्कम केवळ भाडे देण्यामध्ये खर्च होते.नवीन इमारतीचे काम पुढील १८ महिन्यांत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या आम्हाला कार्यालयाच्या इमारतीच्या वापरासाठी भाडे भरावे लागते. स्वमालकीच्या इमारतीमुळे त्याची बचत होईल. सरकारच्या इतर विभागांच्या कार्यालयांना या इमारतीत जागा देण्याचादेखील आमचा विचार आहे. - विक्रम कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड.

टॅग्स :महाराष्ट्र