Join us  

7 कंपन्यांचे बाजार भांडवल 31,966 कोटींनी घटले

By admin | Published: June 23, 2014 11:52 PM

गेल्या आठवडय़ात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 122 अंकांनी खाली आल्यामुळे 1क् मोठय़ा कंपन्यांपैकी 7 कंपन्यांचे बाजार भांडवल 31,966 कोटींनी कमी झाले आहे.

नवी दिल्ली : गेल्या आठवडय़ात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 122 अंकांनी खाली आल्यामुळे 1क् मोठय़ा कंपन्यांपैकी 7 कंपन्यांचे बाजार भांडवल 31,966 कोटींनी कमी झाले आहे. 
टॉप-टेन कंपन्यांतील आयटीसी, टीसीएस आणि इन्फोसिस तीन माहिती तंत्रज्ञान क्षेत्रतील कंपन्या वगळता उरलेल्या सर्व 7 कंपन्यांचे बाजार भांडवल घसरले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी आणि लार्सन अँड टुब्रो यांचा त्यामध्ये समावेश आहे. 
सेन्सेक्समधील टॉप-टेन कंपन्यांपैकी टीसीएस सर्वोच्च स्थानी राहिली. त्यानंतर ओएनजीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, कोल इंडिया, एचडीएफसी बँक, भारतीय स्टेट बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, तसेच लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांचा क्रमांक लागतो. देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा कंपनी असलेल्या टाटा कंसल्टन्सीचे (टीसीएस) बाजार भांडवल 14,क्57.27 कोटींनी वाढून 4,47,856.8 कोटी रुपये झाले 
आहे. 
सार्वजनिक क्षेत्रतील कंपन्यांपैकी ओएनजीसीचे बाजार भांडवल 4,क्64.28 कोटींनी घटून 3,57,362.4 कोटी रुपये झाले आहे. आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल 3,538.2 कोटींनी घटून 1,61,719.5 कोटी झाले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4आयटीसीचे बाजार भांडवल 1,75क्.27 कोटींनी वाढून 2,67,147.99 कोटी रुपये झाले आहे. इन्फोसिसचे बाजार भांडवल 7,693.16 कोटींनी वाढून 1,9क्,395 कोटी रुपये झाले आहे.
 
4रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मूल्यांकन 14,255.7क् कोटींनी घटले आहे. त्यामुळे कंपनीच्या भांडवलाची एकूण किंमत आता 3,35,5क्7.9 कोटी रुपये राहिली. गेल्या आठवडय़ातील घसरणीचा सर्वाधिक फटका रिलायन्सलाच बसला आहे.