"‘ई नाम’द्वारे देशातील बाजार समित्या सशक्त करणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 05:20 AM2019-01-24T05:20:38+5:302019-01-24T05:20:59+5:30

देशातील सर्व बाजार समित्या ‘ई-नाम’ प्रकल्पाच्या माध्यमातून सशक्त करण्याला केंद्र सरकारने प्राधान्य दिले आहे.

"The market committees of the country will be strengthened by 'E-name' | "‘ई नाम’द्वारे देशातील बाजार समित्या सशक्त करणार"

"‘ई नाम’द्वारे देशातील बाजार समित्या सशक्त करणार"

Next

मुंबई : देशातील सर्व बाजार समित्या ‘ई-नाम’ प्रकल्पाच्या माध्यमातून सशक्त करण्याला केंद्र सरकारने प्राधान्य दिले आहे. याद्वारे शेतकऱ्यांना सक्षम करतानाच बाजार समित्यांच्या जोखडातून मुक्त करावयाचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी केले. क्रॉप केअर फाउंडेशन आॅफ इंडियाद्वारे आयोजित ‘किफायतशीर शेती’ या विषयावरील एक दिवसीय परिषदेत केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह बोलत होते. ते म्हणाले, शेतकºयांसमोरील अडचणी दूर करायच्या असतील, तर सरकार आणि उद्योगपतींनी एकत्र येऊन कृषी क्षेत्राला मदत करण्याची गरज आहे. कृषी क्षेत्रासाठी केंद्राने मोठ्या प्रमाणात वित्तीय तरतूद उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्र सरकारनेही कृषी केंद्रित निर्णयांची अंमलबजावणी केली आहे. जलयुक्त शिवारसारख्या महत्त्वाकांक्षी योजनेने राज्यातील अनेक गावे जलसंपन्न झाल्याचेही ते म्हणाले. शेतकºयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवीत असून, त्यातून आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा मिळत आहे. यामध्ये कृषिपूरक उत्पादनांवर आधारित उद्योगांची भूमिका महत्त्वाची आहे.
आधुनिक पद्धतीने शेती करताना शेती क्षेत्रात नावीन्यपूर्ण संशोधन होणे काळाची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन कृषी विद्यापीठांनी कृषी केंद्रीय संशोधनावर लक्ष केंद्रित करणे अगत्याचे असल्याचे मत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. या वेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू विलास फाले, रज्जू श्रॉफ यांची भाषणे झाली.

Web Title: "The market committees of the country will be strengthened by 'E-name'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.