Join us

ठाणे, पालघरमध्ये बाजारात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:07 AM

अनलॉकच्या पहिल्याच दिवशी सोमवारी ठाण्यातील विविध बाजारपेठांमध्ये गर्दी झाली होती. कोर्ट नाका ते रेल्वेस्थानकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सोशल ...

अनलॉकच्या पहिल्याच दिवशी सोमवारी ठाण्यातील विविध बाजारपेठांमध्ये गर्दी झाली होती. कोर्ट नाका ते रेल्वेस्थानकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सोशल डिस्टन्सिंगचे पालन कुठेही झाले नाही. शहराच्या विविध भागांत वाहतूककोंडी झाली. पालघर जिल्ह्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी विविध अवजारे तसेच अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. नवी मुंबईमध्ये जवळपास दोन महिन्यांनंतर सर्व माॅल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले. रायगडमध्ये कडक निर्बंध लागू असल्याने कारवाईच्या भीतीपोटी ग्रामीण भागातील नागरिकांनी शहरातील बाजारपेठेत येणे टाळले.

मुंबईत उत्साह

मुंबईत जवळपास दीड महिन्यांनी मोकळीक मिळालेल्या नागरिकांनी रस्त्यांवर अक्षरश: गर्दी केली. शहर आणि उपनगरातील सर्व लहान - मोठ्या बाजारपेठांमध्ये आवश्यक गाेष्टींच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली. या अतिउत्साही नागरिकांना आवरताना प्रशासनाच्या मात्र नाकीनऊ आले होते. सकाळपासून ऊन डोक्यावर येईपर्यंत रस्त्यांवर सैरावैरा भटकणाऱ्या नागरिकांचा उत्साह दुपारी २ नंतर मावळला, सायंकाळी पाचनंतर यात पुन्हा भर पडली.