Join us  

गुढीपाडव्यासाठी बाजार फुलला!

By admin | Published: March 21, 2015 12:46 AM

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला शहरात प्रचंड खरेदी होते. महागाई वाढली असली तरीही यंदा पाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे.

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला शहरात प्रचंड खरेदी होते. महागाई वाढली असली तरीही यंदा पाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दागिने आणि वस्त्रप्रावरणांच्या बाजारात ही उलाढाल अपेक्षित आहे. शहर-उपनगरातील क्रॉफर्ड मार्केट, नटराज, महमद अली मार्ग, भुलेश्वर, फॅशन स्ट्रीट, वांद्रे लिंक रोड अशा वेगवेगळ्या मार्केट्समध्ये खरेदीसाठी गर्दी दिसत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वस्तूंबरोबरच खरेदीदार नवा टीव्ही, रेफ्रिजरेटर, संगणक, लॅपटॉप तसेच उंची मोबाइलच्या खरेदीवर जास्त भर देण्याची शक्यता आहे. सध्याचा जमाना संगणक व मोबाइलचा आहे. याच पार्श्वभूमीवर संगणक आणि लॅपटॉप तसेच मोबाइल या सर्व सुविधा एकाच वेळी उपलब्ध करून देणाऱ्या टॅबलेट्सची क्रेझ अधिक आहे. नववर्षाची खरेदी उपयुक्त आणि सदैव स्मरणात राहील, अशा वस्तूने करण्याची मानसिकता अधिक असते. (प्रतिनिधी)दागिन्यांचीही उलाढाल होणारशहर आणि परिसरातील सराफी पेढ्यांमध्ये मोठी गर्दी आणि उलाढाल अपेक्षित आहे. मागील पाच ते सहा वर्षांत सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र दागिने खरेदी करण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. आपल्याला परवडेल तितक्या किमतीचे दागिने मुहूर्तावर खरेदी करण्याची परंपरा जपत आले आहेत.