रायगड जिल्ह्यात बाजारपेठा बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:06 AM2021-04-11T04:06:27+5:302021-04-11T04:06:27+5:30
नवी मुंबईमध्ये कडक लॉकडाऊन लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी लागू केलेल्या कडक निर्बंधांचे शनिवारी ...
नवी मुंबईमध्ये कडक लॉकडाऊन
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी लागू केलेल्या कडक निर्बंधांचे शनिवारी नवी मुंबईकरांनी काटेकोरपणे पालन केले. दिघा ते बेलापूरदरम्यान अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद होती. शहरात सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. महानगरपालिका व पोलिसांचे पथक शहरभर फिरून नियम पाळून सहकार्य करण्याचे आवाहन करत होते. पामबीच रोड, ठाणे-बेलापूर रस्ता व सायन-पनवेल महामार्गावरही वाहनांची संख्या कमी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.
पालघरला रस्त्यावर शुकशुकाट
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासूनच वीकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळून सर्व बाजारपेठा शनिवारी पूर्णपणे बंद होत्या. तुरळक रिक्षा व खाजगी वाहतुकीव्यतिरिक्त रस्त्यांवर मात्र शुकशुकाट होता. तारापूर औद्योगिक वसाहत सुरू होती, परंतु कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी होती. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे पोलीस व अधिकाऱ्यांचा फौजफाटा नाक्यानाक्यांवर तैनात होता. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखून साखळी तोडण्याकरिता शासनाने जाहीर केलेल्या ‘मिनी लॉकडाऊन’ला शनिवारी परिसरातील अत्यावश्यक सेवा वगळता चांगला प्रतिसाद मिळाला.