मकरसंक्रांतीच्या रंगात रंगल्या बाजारपेठा !

By admin | Published: January 13, 2017 07:14 AM2017-01-13T07:14:29+5:302017-01-13T07:14:29+5:30

‘तीळ-गूळ घ्या गोडगोड बोला’ म्हणत वर्षाची आनंदाने सुरुवात करणारी ‘मकरसंक्रांत’ अगदी दोन दिवसांवर

Markets coloring markets! | मकरसंक्रांतीच्या रंगात रंगल्या बाजारपेठा !

मकरसंक्रांतीच्या रंगात रंगल्या बाजारपेठा !

Next

मुंबई : ‘तीळ-गूळ घ्या गोडगोड बोला’ म्हणत वर्षाची आनंदाने सुरुवात करणारी ‘मकरसंक्रांत’ अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. याचे स्वागत करण्यासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. तिळाचे लाडू, साखर फुटाणे, सुगड, ऊस, भोगीसाठी लागणाऱ्या भाज्या या साऱ्यांनी बाजारात गर्दी केली असून या साऱ्याच्या खरेदीला आता वेग आला आहे.
मकरसंक्रांत जवळ आली की, दरवर्षी तिळाचे भाव हा चर्चेचा विषय असतो. परंतु यंदा तिळाची आवक चांगली असल्यामुळे तिळाचे लाडू अधिक गोड झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. मकरसंक्रांतीनिमित्त बाजारात आलेल्या नव्या वस्तूही अनेकांना आकर्षून घेत आहेत. हलव्याचे
दागिने असो की, हळदीकुंकूसाठी
वाण असो, या साऱ्या वस्तूंमध्ये विविधता पाहायला मिळत आहे. (प्रतिनिधी)

तीळ झाले स्वस्त

सण आला की महागाई आलीच. परंतु नव्या वर्षातील पहिल्याच सणाने महिलावर्गाला दिलासा दिला आहे. ऐन संक्रांतीत महागणारा तीळ सध्या स्वस्त झाल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. २०० रुपये किलोच्या घरात पोहोचणारा तीळ सध्या १३० रुपये किलो आहे. त्यामुळे तिळाची खरेदीही मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याचे भांडुप येथील दिलीप जोशी या विक्रेत्याने सांगितले.

चंद्रकळेला पंजाबी
ड्रेसचा पर्याय
तरुणांसाठी काळ्या रंगाच्या पंजाबी ड्रेसचे कलेक्शन अनेक दुकानांमध्ये पाहायला मिळत आहे. शिवाय इमिटेशन ज्वेलरी आणि सौंदर्यप्रसाधने मिळणाऱ्या ठिकाणी काळ्या रंगाच्या नेलपेंट्स, काळ्या रंगातले स्टड, नोझ पिन, झुमकेही मुली खरेदी करीत आहेत असे घाटकोपर येथील विक्रेता जुनेद खान याने सांगितले.

‘नायलॉनच्या मांजाच्या वापर टाळा’

च् नायलॉनच्या मांजाचा वापर केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नायलॉनच्या मांजाचा वापर टाळा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
च्पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी आणि प्राणी अथवा मनुष्याची इजा टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अशा धाग्यांवर बंदी तसेच साठवणूक न करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई पोलिसांनी १२ जानेवारी ते ११ फेब्रुवारीपर्यंत ही बंदी घातली आहे.
च् साठवणूकदार यांनी तत्परतेने नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक थांबवावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

रेडिमेड गोडधोड

परदेशी राहणाऱ्या आप्तेष्टांना मकरसंक्रांतीच्या दिवशी येथील ‘गूळपोळी’ या पारंपरिक पदार्थाचा आस्वाद घेता यावा यासाठी अनेक दुकानांनी परदेशी पदार्थ पाठविण्याची सोयही केलेली आहे. याशिवाय वृद्धांसाठी नरम आजी-आजोबा लाडू, तिळवडी असे पदार्थही हमखास पाहायला मिळत आहेत. तिळाचे लाडू कडक असतात, त्यामुळे अनेक ज्येष्ठांना त्याचा आस्वाद घेता येत नाही म्हणूनच अशा प्रकारचे लाडू ठेवल्याचे दादर येथील विक्रेत्या कला जोशी यांनी सांगितले.

हळदीकुंकूलाही नावीन्यतेचे वेष्टन

हळदीकुंकू ही अनोख्या पद्धतीने पॅक करण्यात आले आहे. शिंपले, पतंग, प्रेझेंट पॉकेट, ओरिगामी फुलपाखरू या रूपात बांधलेले हळदीकुंकवाचे पुडे पाहायला मिळत आहेत. याशिवाय वाण म्हणून अनेक जण या दिवशी गुळाची ढेप देतात. या गुळालाही मोदकाचा आकार देण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकारांना महिलावर्गाची अधिक पसंती मिळत आहे.

Web Title: Markets coloring markets!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.