मुंबई : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत त्यापार्श्वभूमीवर राज्यात विकेंड लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळे अनेकजण घराबाहेर पडत नव्हते रविवार असूनही बाजारपेठा ओसाड पडल्याचे चित्र होते.
शनिवारप्रमाणे रविवारीही दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण मुंबईत शुकशुकाट होता. छोट्या आणि मोठ्या बाजारपेठांसह बहुतांश सर्वच दुकाने दिवसभर बंद होती. काही अपवादात्मक ठिकाणी दुकानांचे शटर अर्धे खुले ठेवून व्यवहार होत होते.
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन ही साखळी तोडण्यासाठी सरकारने केलेल्या विकेंड लॉकडाऊनचे आवाहन केले होते.
रविवारी मुंबईकरांनी एकत्र येणे, फिरणे, घराबाहेर पडणे टाळले. काही सोसायटी अथवा रहिवासी क्षेत्रात काही दुकाने सुरू करण्यात आली होती. मात्र हे प्रमाण तुलनेने फारच कमी होते. अगदीच दूध, अंडी किंवा इतर महत्त्वाचे साहित्य घेण्यासाठी किराणा दुकानांकडे नागरिक फिरकत होते. द दक्षिण मुंबईतील मनीष मार्केटसह मस्जिद बंदर येथील बहुतांश दुकाने बंद होती. मनीष मार्केटसारखे मोठे मार्केटच बंद असल्याने दक्षिण मुंबईतील परिसरात शुकशुकाट होता. मनीष मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी सकाळपासून येथील व्यापार, व्यवहार ठप्प आहे. दुकाने सकाळपासून बंद आहेत. अशीच परिस्थिती मस्जिद बंदर येथील बाजारपेठांत होती. मात्र येथे थोडी रहदारी हाेती. गिरगाव येथील रहिवासी क्षेत्रातही दुकाने पूर्णत: बंद होती. काही व्यवहार शटर अर्धे ठेवून सुरू होते. मात्र हे प्रमाण कमी होते. दादर येथे सकाळी वर्दळ असली तरी नंतर मात्र दादर येथे सकाळी वर्दळ असली तरी नंतर मात्र येथील गर्दी कमी झाली. मुंबईमधील सर्वच प्रमुख रस्त्यांवर गर्दी नव्हती. रोजच्या तुलनेत शनिवारी धावणाऱ्या वाहनांचे प्रमाण कमी होते. शिवाय एस. टी., बेस्ट बससह रिक्षा आणि टॅक्सीही कमी प्रमाणात रस्त्यांवर उतरल्या होत्या. सकाळी ही रहदारी काहीशी वेगाने सुरू असली तरी दुपारनंतर ती कमी झाली. रेल्वे प्रवासातही बरेच कमी प्रवासी असल्याचे चित्र हाेते.
कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. सात दिवस आधी सांगितले त्यामुळे तयारी करून दोन दिवस कडकडीत बंद
पाळण्यात आला आहे. पण यापुढे लॉकडाऊन लावण्याची चर्चा आहे. मात्र सरकारकडे एक्सिट प्लॅन नाही. सरकारने कामगार, उद्योजक, व्यावसायिक यांना दिलासा द्यावा मग लॉकडाऊन करावा.
अनिल फोंडेकर, अध्यक्ष, मुंबई व्यापारी असोसिएशन