Join us

दोन आठवडयात मरोळ सुकी मासळी बाजाराची वेळ होणार पूर्ववत

By मनोहर कुंभेजकर | Published: December 28, 2022 7:22 PM

येत्या दोन आठवडयात अंधेरी पूर्व जेबी नगर मेट्रो स्टेशन लगत असलेल्या मरोळच्या पुरातन सुक्या मासळीची बाजाराची वेळ पूर्ववत होणार आहे.

मुंबई-येत्या दोन आठवडयात अंधेरी पूर्व जेबी नगर मेट्रो स्टेशन लगत असलेल्या मरोळच्या पुरातन सुक्या मासळीची बाजाराची वेळ पूर्ववत होणार आहे.येथे गुरुवार आणि शनिवारी सुमारे चार हजार कोळी महिला व विक्रेते मासळी विक्री करतात.

मरोळ बाजार   मासळी विक्रेता  कोळी  महिला संस्थेच्या अध्यक्षा राजेश्री भानजी व मुंबई, ठाणे कोळी गावच्या महिलांच्या लढ्याला अखेर यश येवून येथील कोळी महिलांना गुरूवारी सकाळी मासे  विक्री करण्यास बाजार विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रकाश रसाळ यांनी येत्या दोन आठवडयात आज हिरवा कंदील दिला आहे. राजेश्री भानजी यांनी नववर्षच्या शुभवर्तमानाची बातमी लोकमतला दिली.

गुरुवारी  दुपारी दोन वाजता बाजारात मासळी आणण्यास परवानगी दिली जाईल व शुक्रवारी दुपारी 4 वाजता माल विकण्यास परवानगी दिली जाईल असे पालिकेच्या सहाय्यक महानगरपालिका (बाजार) यांनी दि, 1 डिसेंबर 2022 पासून परिपत्रक  काढले होते.याचे संतप्त पडसाद वेसावे, मढ, भाटी,गोराई,  उत्तन, चौक, अर्नाळा आदी भागात पडले होते.

त्यामुळे  या वेळेत बदल करावा या मागणीसाठी काल सकाळी येथील मरोळ बाजार   मासळी विक्रेता  कोळी  महिला संस्थेच्या कोळी सभासद महिलांनी दि,22 डिसेंबर रोजी  कायदा हातात घेत या बाजाराचे  कुलूप तोडत मासळी बाजाराचा ताबा घेत बाजारात प्रवेश केला.दि,22 रोजी लोकमत ऑनलाईन व दि,23 रोजी लोकमतमध्ये याबाबतचे सविस्टर्सवृत प्रसिद्ध होताच राज्यातील सागरी किनारपट्टीवर लोकमतचे वृत्त व्हायरल झाले.

वर्सोव्याच्या स्थानिक आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी विधानसभेत या प्रकरणी आवाज उठवून सदर बाजाराची वेळ पूर्ववत करण्याची त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कडे आग्रही मागणी केली. तर वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त अ‍ॅड. गॉडफ्रे पिमेंटा व बॉम्बे ईस्ट इंडियन असोसिएशनचे विश्वस्त अ‍ॅड. विवियन डिसोझा व रिटा डिसा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इमेल द्वारे सदर बाजाराची वेळ येथील कोळी महिलांच्या मागणी प्रमाणे पूर्ववत करा अशी मागणी केली होती. 

लोकमत ऑनलाईन आणि लोकमत मध्ये या महत्त्वाच्या प्रश्नांला वाचा फोडल्याने या संस्थेच्या 4000 कोळी महिला सभासदांच्या वतीने राजेश्री भानजी यांनी लोकमतचे व आमदार डॉ.भारती लव्हेकर यांचे आभार मानले.

टॅग्स :मुंबई