ब्लॅकमेल करून विवाहितेवर बलात्कार

By admin | Published: May 26, 2017 12:43 AM2017-05-26T00:43:39+5:302017-05-26T00:43:39+5:30

विवाह करण्याचे वचन देत शरीरसंबंध ठेवून अश्लील छायाचित्रे काढल्याच्या आरोपावरून मालाड (पूर्व) येथील महेंद्र

Marriage rape by blackmail | ब्लॅकमेल करून विवाहितेवर बलात्कार

ब्लॅकमेल करून विवाहितेवर बलात्कार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विवाह करण्याचे वचन देत शरीरसंबंध ठेवून अश्लील छायाचित्रे काढल्याच्या आरोपावरून मालाड (पूर्व) येथील महेंद्र नगरात राहाणाऱ्या नितीन पांचाळ याच्याविरुद्ध चारकोप पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
सहा वर्षांपूर्वी आपली नितीन पांचाळ याच्याशी ओळख झाली. आपण घटस्फोटीत असल्याचे सांगून नितीन पांचाळ याने आपल्याशी विवाह करण्याचे वचन दिले. त्यादरम्यान आपल्यासोबत शरीरसंबंध ठेवले. त्याचवेळी आपला विश्वास संपादन करून एक लाख रुपयांची मागणी केली. विवाह करण्याचे ठरले असल्याने आपण तीन टक्के व्याजाने त्याला कर्ज काढून दिले. बरेच दिवस ती रक्कम परत न केल्याने आपण विचारणा केली असता त्याने धमकावल्याचे तक्रारदार महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
पैसे मागितल्यानंतर पांचाळने त्याला मोबाइलमधील माझ्या नकळत काढलेले माझे अश्लील फोटो दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. काही फोटो त्याने माझ्या मोबाइलवरही पाठवल्याचे या महिलेने निवेदनात म्हटले आहे.
पोलीस याबाबत तक्रार दाखल करण्यात टाळाटाळ करीत होते. मात्र राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी खासदान हुसेन दलवाई यांना निवेदन पाठवले. त्यावरून दलवाई यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले. मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेत कारवाईचे लेखी आदेश दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मोहन कृष्णन यांनी सांगितले.
चारकोप पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक तानाजी खरात याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Marriage rape by blackmail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.