Join us

शहीद मेजर कौस्तुभ राणेंचे पार्थिव मुंबईत, लष्कराकडून मानवंदना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 21:02 IST

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचे पार्थिव मुंबईत दाखल झाले. मुंबईतील दाखल झाल्यानंतर लष्कराकडून त्यांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आली.

मुंबई : शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचे पार्थिव मुंबईत दाखल झाले. मुंबईतील दाखल झाल्यानंतर लष्कराकडून त्यांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आली.जम्मू -काश्मीर येथे दहशतवाद्यांशी दोनहात करताना महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले. मेजर कौस्तुभ राणे यांचे पार्थिव श्रीनगरवरुन आज दुपारी विमानाने दिल्लीला पोहोचले. त्यानंतर दिल्लीहून ते पार्थिव मुंबईला रात्री सातच्या सुमारास आणण्यात आले. यावेळी त्यांच्या पार्थिवाला लष्कराकडून मानवंदना देण्यात आली. 

दरम्यान, मेजर कौस्तुभ राणे यांचे पार्थिव मालाड येथील शवगृहात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर गुरुवारी 9 ऑगस्ट रोजी सकाळी मीरा रोड येथील त्यांच्या निवासस्थानी परिवार आणि नातेवाईकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत कौस्तुभ यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर सकाळी 10 वाजता मीरा रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  

टॅग्स :कौस्तुभ राणेंभारतीय जवानजम्मू-काश्मीरशहीद