मुंबई : शहीद जवानांच्या वारसांना पात्रतेनुसार एसटी महामंडळात नोकरी देणा-या तसेच त्यांच्या पत्नींना आजीवन मोफत प्रवासाचा पास उपलब्ध करु न देणा-या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी झालेल्या कार्यक्रमात करण्यात आली.परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या संदर्भातील सादरीकरण करु न योजनेची घोषणा केली. गडचिरोली जिल्ह्यातील आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी तरु णांना एसटी महामंडळात नोकरी उपलब्ध करून देणाºया बिरसा मुंडा पुनर्वसन प्रकल्पाचाही प्रारंभ झाला.‘स्लीपर शिवशाही’ व ‘लालपरी’चे लाँचिंगशयनयान (स्लीपर कोच) शिवशाही बसचे अनावरण करण्यात आले. त्साध्या बसचे ‘लालपरी’ हे नवीन डिझाईन तयार करण्यात आले असून त्याचेही अनावरण देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी युवतींना एसटी चालक पदासाठी प्रशिक्षण व नियुक्ती देण्याच्या योजनेचाही प्रारंभ झाला. गडचिरोलीत नक्षलग्रस्त भागातील योजनांचा प्रारंभ करण्यात आला.मुख्यमंत्री म्हणाले की, नक्षलग्रस्त तरु णांच्या पुनर्वसनासाठी सुरू केलेली बिरसा मुंडा पुनर्वसन प्रकल्प योजना महत्वपूर्ण आहे.उद्धव ठाकरे म्हणाले की, एसटीची स्थानके तसेच एसटी बसेस आता बदलत आहेत. आदिवासी, समर्पण केलेले नक्षलग्रस्त तरु ण, आपत्तीग्रस्त शेतमजूर, शहीद जवानांच्या पत्नींसाठी सुरू केलेल्या योजना महत्त्वाच्या आहेत.नक्षलवादी तरु णांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणणे आवश्यक असून त्यासाठी एसटी महामंडळ योगदान देईल, असे रावते यांनी सांगितले. एसटी महामंडळातील अधिकाºयांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११ लाख रु पयांचा धनादेश एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द करण्यात आला.उद्योग मंत्री सुभाष देसाई, आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खा. अरविंद सावंत, अनिल देसाई, आ. वारिस पठाण, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक आदी उपस्थित होते.पुण्याच्या स्वारगेट एसटी स्थानकाच्या ठिकाणी अत्याधुनिक मल्टिमॉडेल बस पोर्ट तयार करणार येतील. या ठिकाणी मेट्रो, बस आणि इतर वाहतूक सेवा एकत्रित करणार आहे. एसटी बसस्थानकावर लोक तासन्तास थांबतात. त्यांच्यासाठी छोटेखानी मराठी चित्रपटांसाठी राखीव सिनेमागृहाची संकल्पना आहे. प्रशिक्षणार्थी अदिवासी चालक युवकांना प्रशिक्षणादरम्यान प्रती महिना चारशे रुपयांपासून २ हजार ५०० रुपये वाढवण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. ती पूर्णत्वास नेली जाईल. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
शहीदांच्या पत्नींना एसटीमध्ये आजीवन मोफत प्रवास; शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 1:42 AM