मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे कमला मिलमधील संघटन सचिव आणि गिरण गावातील कबड्डी खेळाचे कुशल संघटक मारुती जाधव यांचे साेमवारी केईएम रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात सुनील व रामचंद्र हे छत्रपती पुरस्कार विजेते मुलगे आणि स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे. मारुती जाधव सुनील स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष, मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे आजीव अध्यक्ष व ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य होते.
-------------
समन्वयाने काम करणे गरजेचे - केदार
मुंबई : क्रीडाविषयक कामगिरी अधिक उंचावण्यासाठी राज्य शासनाचा क्रीडा विभाग, लष्कर आणि एनसीसी यांनी समन्वयाने काम करणे गरजेचे असल्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांनी सांगितले. लष्कर आणि एनसीसी यांच्यासमवेत दृकश्राव्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. महाराष्ट्रात क्रीडाविषयक विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
...................................