Join us

अहवाल : बिर्याणीसह मसाला डोसा सर्वाधिक लोकप्रिय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 6:47 AM

आम्ही सारे खवय्ये : खाजगी फूड डिलिव्हरी कंपनीचा वार्षिक अहवाल

मुंबई : गावाची, तालुक्याची, जिल्ह्याची आणि राज्याची जसजशी वेस बदलते तसतशा पदार्थांच्या चवीही बदलतात; आणि खवय्येदेखील आपापल्या परीने प्रत्येक पदार्थाची चव चाखत पोटाबा भरत असतात. अशाच काहीशा भारतीय खवय्यांकडून सातत्याने कोणत्या ना कोणत्या तरी खाद्यपदार्थांच्या आॅर्डर दिल्या जात असून, या आॅर्डरच्या मागणीमध्ये सर्वप्रथम कोणत्या खाद्यपदार्थाने स्थान पटकाविले असेल तर ते ‘चिकन बिर्यानी’ने. याव्यतिरिक्त मसाला डोसाही तितकाच लोकप्रिय आहे.

एका खाजगी फूड डिलिव्हरी कंपनीच्या वार्षिक अहवालातून ही बाब समोर आली असून, भारतीयांकडून एका मिनिटाला ९५ बिर्यानींची आॅर्डर दिली जात आहे. खिचडीची आॅर्डर देण्याचे प्रमाण २०१९ साली १२८ टक्क्यांनी वाढले आहे. केकची आॅर्डर देण्याचे प्रमाणही आकर्षक असून, दिल्ली, बंगळुरू, मुंबई, हैदराबाद आणि चेन्नई या शहरांतून गुलाबजामूनच्या आॅर्डर मोठ्या प्रमाणावर दिल्या जातात. विशेषत: कोईम्बतूरसारख्या शहरांत पोंगल आणि इडलीसारख्या खाद्यपदार्थांच्या आॅर्डर भल्या पहाटे दिल्या जात असल्याच्याही नोंदी आहेत.काय आवडे भारतीयांनाच्दहीभात किंवा खिचडीच्मेथी मलाई पनीर च्ढाबी डाळच्जीबी राइस च्दाल माखणीच्मिनी डोसा च्इडलीच्वडा आणि सांबर थाळी

टॅग्स :अन्नमुंबई