तो मास्कही गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:06 AM2021-03-10T04:06:27+5:302021-03-10T04:06:27+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : घरातून बाहेर पडताना पतीच्या तोंडावर पायोनिअर कंपनीचा साधा मास्क होता. तसेच मोबाइल फोन, दीड ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घरातून बाहेर पडताना पतीच्या तोंडावर पायोनिअर कंपनीचा साधा मास्क होता. तसेच मोबाइल फोन, दीड तोळ्याची सोन्याची चेन, अंगठी, पैशांचे पाकीट, ५ ते ६ एटीएम कार्डे होती. मात्र मृतदेह आढळला तेव्हा त्यापैकी काहीही सापडले नाही. त्यांच्या तोंडावर स्कार्फ होता. त्यात ५ ते ६ रुमाल होते. पती चांगले स्वीमर असल्याने त्यांचा बुडून मृत्यू होऊच शकत नाही. त्यामुळे त्यांची हत्याच झाल्याचा संशय पत्नी विमला यांनी वर्तवला.
* आपलेच पोलीस आहेत म्हणत घराबाहेर पडले
४ मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पती हिरेन दुकानावरून लवकर घरी परतले. याबाबत त्यांच्याकडे विचारणा करताच, त्यांनी कांदिवली गुन्हे शाखेतून तावडे नावाच्या व्यक्तीने कॉल करून भेटण्यासाठी बोलावल्याचे सांगितले. आपलेच पोलीस आहेत, त्यांचा सल्ला घेण्यासाठी घोडबंदर येथे जात असल्याचे सांगितले. दुचाकीवरून न जाता रिक्षानेच जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुलाला दुकानातच थांबवून ठेवले. रात्री साडेनऊ वाजता मुलगा घरी आला तेव्हा त्याने वडील अजून घरी का आले नाहीत, याची चौकशी केली. दिराकडेही याबाबत विचारणा केली. रात्री ११ वाजेपर्यंत वाट बघितली. त्यानंतर फाेन केला. वाझे यांच्याकडेही त्याने वडिलांबाबत विचारणा केली. त्यांनी काहीच माहिती नसल्याचे सांगितले. अखेर दुसऱ्या दिवशी नौपाडा पोलिसांत तक्रार दिल्याचे विमला यांनी तक्रारीत नमूद केले.
....................