मुंबई: #मास्कमॅडेटरी मोहिमेला सोशल मीडियावर उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत हजारो नागरिकांनी सोशल मीडियावर या मोहिमेला प्रतिसाद दिल्याची माहिती राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी लोकमतला दिली.
मास्क मॅडेटरी कॅम्पेनद्वारे वाढलेला करोना, लोकांचा मास्क न वापरणे, सोशल डिस्टेसिंग न ठेवणे, किंवा हात न धुणे ही आता लोकांची सवयच जणू झाली आहे . दुकानासमोर मॉल समोर थर्मल गन घेऊन शरीराचे तापमान पाहणारा आता गायब झाला,तर सॅनिटायझर चा स्टॅण्ड ही रिकामी सॅनिटायझरची बाटली घेऊन उभा राहीला लोकांमध्ये प्रचंड अनास्था तयार झाली आहे. लोक मास्क वापरण्याची प्रचंड तसदी घेत नाही. त्यामुळे ड्रॉपलेट इन्फेक्शन, काही प्रमाणात एअरबॉर्न इन्फेक्शन मुळे करोना खूप वेगात पसरतो आहे आणि रुग्ण वाढत आहे लॉकडाउन हे उत्तर नाही उलट लोकांनी मास्क वापरून स्वतःला संरक्षित करण्याची गरज आहे. त्यामुळे आपण सोशल मिडियाद्वारे मास्क मॅडेटरी कॅम्पेन सुरू केल्याचे डॉ.दीपक सावंत यांनी सांगितले.
अंतर ठेवून आपल्यापर्यंत संसर्ग पोहोचणार नाही याची काळजी स्वतःच घेतली पाहिजेे. हात स्वच्छ साबणाने वारंवार धुऊन वेगवेगळ्या पृष्ठभागावरून असलेला कोविड -१९ चा विषाणू आपल्या नाकातोंडा पर्यंत पोहोचणार नाही तो साबणाने डीॲक्टीव्ह कसा होईल याची काळजी घेणे आवश्यक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
हे सर्व लक्षात घेऊन मास्क मँडेटरी # ही मोहीम आपण सोशल मीडीयावरून ' एकसूत्री ' लोकांपर्यंत पोहोचून तिचा अवलंब व्हावा फेसबुक ट्विटर या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचून त्याचा परिणाम वर्तनातून साधता येईल असा आशावाद डॉ. दीपक सावंत यांनी प्रकट केला.