Join us

वाशीत ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी जनजागृती मोहीम

By admin | Published: June 15, 2014 1:29 AM

वर्ल्ड एल्डर अ‍ॅब्युज डे निमित्त ग्लोबल सक्सेस फाउंडेशनच्या वतीने आज वाशीत जनजागृती मोहिम राबविली. यात ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याचे व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.

नवी मुंबई : वर्ल्ड एल्डर अ‍ॅब्युज डे निमित्त ग्लोबल सक्सेस फाउंडेशनच्या वतीने आज वाशीत जनजागृती मोहिम राबविली. यात ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याचे व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. भारतात सध्या ७.९ कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र सध्याच्या मॉर्डन जमान्यात तरूणवर्गाला ज्येष्ठ नागरिकांकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे त्याना मानसिक आणि आरोग्याच्या समस्येत वाढत होताना दिसत आहेत. अनेक जण घरातील वृध्दांना वृध्दाआश्रमात दाखल करतात. ते होऊ नये. ज्येष्ठ नागरिकांची आपुलकीने काळजी घ्यावी. तसेच त्याच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. त्यांना मानसिक आधार द्यावा. यासाठी तरूणांमध्ये जनजागृती करण्यासाठी या मोहिम राबविण्यात आली होती. वाशी येथील एका मॉलमध्ये आज फॅश मॉब केला. यात मुलांनी ज्येष्ठांविषयी घ्यावयाची काळजीचे माहितीपत्रक नागरिकांना दिले. तसेच विविध गाण्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती केली. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांच्या छळाविरोधी जागृती करण्यासाठी सेल्फीविथसिलव्हर्स ही आॅनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तसेच सोशल मिडीयातून ज्येष्ठ नागरिकांची मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या मोहिमेला तरूणवर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही मोहिम अशा प्रकारे पुढे चालविणार असून लोकांमध्ये ज्येष्ठांविषयी जनजागृती करणार असल्याचे ग्लोबल सक्सेस फाउंडेशनचे संस्थापक सचिन अधिकारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)