वसई सेतूमार्फत जनतेची लूट

By admin | Published: June 17, 2014 12:57 AM2014-06-17T00:57:29+5:302014-06-17T00:57:29+5:30

सेतू’ अर्थात सेवा तुमची, सेतू हा सर्वसामान्य व प्रशासन यांना जोडणारा पूल आहे. नागरिकांना सुलभरीत्या दाखले मिळावे म्हणून सेतूची स्थापना करण्यात आली

Mass robbery through Vasai Setu | वसई सेतूमार्फत जनतेची लूट

वसई सेतूमार्फत जनतेची लूट

Next

अमर म्हात्रे, नायगांव
‘सेतू’ अर्थात सेवा तुमची, सेतू हा सर्वसामान्य व प्रशासन यांना जोडणारा पूल आहे. नागरिकांना सुलभरीत्या दाखले मिळावे म्हणून सेतूची स्थापना करण्यात आली, मात्र वसई सेतूची स्थिती पाहता सेवा आमचीच हा प्रत्यय येत असल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांनी सेतूचा ठेका रद्द करण्याचे आदेश तहसीलदार वसई यांना दिले आहेत.
सेतूबाबत अनेक तक्रारी दाखल होत असल्याने याबाबत कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. वसईत अनुसूचित जाती - जमाती मोठ्या प्रमाणात आहेत. शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक दाखल्यांसाठी येतात, मात्र प्रत्यक्षात खेटा मारुनही प्रकरण सापडेल की नाही याबाबत साशंकता असेल.
आदेशात दलालांचाही सुळसुळाट वाढल्याने सर्वसामान्यांना आर्थिक पिळवणुकीला सामोरे जावे लागत असल्याचे म्हटले जाते. विशेष म्हणजे सदर सेतू कार्यालय सहा दिवसच उघडे असल्याने इतर दिवशी नागरिकांना रांगा लावाव्या लागतात.

Web Title: Mass robbery through Vasai Setu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.