Join us

BREAKING: मुंबईत मालाडमध्ये सेंटर प्लाझा इमारतीला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 15:28 IST

Mumbai News, Malad fire: मुंबईत मालाड पूर्व येथील सेंटर प्लाझा नावाच्या इमारतीला भीषण आग लागली आहे.

मुंबई

मुंबईत मालाड पूर्व येथील सेंटर प्लाझा नावाच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. मालाड पूर्वेच्या दफ्तरी रोडवर असलेल्या सेंटर प्लाझा नावाच्या इमारतीत पाचव्या मजल्यावर आग भडकली. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  

आगीचं स्वरुप भीषण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून आग इतर मजल्यांवरही पसरण्याची शक्यता आहे. इमारतीच्या खिडक्यांच्या काचा आगीनं फुटून खाली रस्त्यावर पडत आहेत. त्यामुळे परिसरातही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

टॅग्स :आगमुंबई