भातशेती, कांद्याचे प्रचंड नुकसान
By Admin | Published: March 1, 2015 11:03 PM2015-03-01T23:03:03+5:302015-03-01T23:03:03+5:30
काल रात्रीपासून वसई-विरार उपप्रदेशात पुन्हा अवकाळी पावसाचे आगमन झाले. काल संपूर्ण रात्र तर आज दिवसभर कोसळलेल्या पावसाने शहरी
वसई : काल रात्रीपासून वसई-विरार उपप्रदेशात पुन्हा अवकाळी पावसाचे आगमन झाले. काल संपूर्ण रात्र तर आज दिवसभर कोसळलेल्या पावसाने शहरी भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले तर ग्रामीण भागात तयार झालेल्या भाताचे तसेच पांढऱ्या कांद्याच्या पिकाचे नुकसान झाले.
काल दिवसभर वसई -विरार उपप्रदेशात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसामुळे अनेक भागातील वीजपुरठा खंडीत झाला. रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले, तालुक्याच्या पश्चिम भागातील भुईगाव गावातील कांदे उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पूर्व भागात तयार झालेला भात खळीत ठेवण्यात आला होता. काल अचानक आलेल्या पावसाने या भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आज दिवसभर उपप्रदेशामध्ये गारवा होता. या पावसाने महावितरण च्या कारभाराचाही बोऱ्या वाजला, काल मध्यरात्रीपासून वीजेचा लपंडाव सुरू होता आजही सकाळपासून अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला. या अवकाळी पावसाने झालेल्या शेती व बागायतीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. भुईगाव या गावांमध्ये पांढऱ्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेण्यात येते यंदा हे पीक हातचे गेल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. ४ वर्षापूर्वी अशाच अवकाळी पावसामुळे या गावातील कांदा उत्पन्नाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.