लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील भिवंडी रोड या सर्वात यशस्वी व्यवसाय विकास युनिटने नवीन वर्षात भरीव कामगिरी नोंदविली आहे. दोन महिन्यात ३.४२ लाख पॅकेजेसद्वारा ४,५९१ टन पार्सल पाठविले असून, त्यापासून २.६१ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. यात फेब्रुवारी - २०११ मध्ये १.९५ लाख पॅकेजेस द्वारा २,६०६ टन पार्सल पाठविण्यात आले असून, १.४७ कोटी रुपये उत्पन्न मिळाले, तर जानेवारी २०२१मध्ये १.४६ लाख पॅकेजेस द्वारा १,९८५ टन पार्सल पाठविण्यात आले असून, १.१४ कोटी रुपये उत्पन्न मिळाले.
१.९८ लाख पॅकेजेसद्वारा एकूण २,२४७ टन पार्सल शालिमार (पश्चिम बंगाल) येथे पाठविण्यात आले असून, त्यानंतर १.०२ लाख पॅकेजेसद्वारा १,८३६ टन पार्सल अजरा (गुवाहाटी) आणि ४०,६५२ पॅकेजेसद्वारा ५०७ टन पार्सल दानापूर (बिहार) येथे जानेवारी, फेब्रुवारी २०२१ मध्ये पाठविण्यात आले. पाठवलेल्या वस्तूंमध्ये फर्निचर, रेफ्रिजरेटर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, खाद्य उत्पादने, औषधे, प्लास्टिक वस्तू, पिशव्या, स्टेशनरी, वंगण तेल आणि सौंदर्यप्रसाधने इत्यादी समाविष्ट आहेत. भिवंडी बीडीयूने याआधी वर्ष २०२० मध्ये ४.७३ लाख पॅकेजेसद्वारा एकूण ७,२४६ टन पार्सल पाठविले होते.