खाद्य संस्कृतीला चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:05 AM2021-07-12T04:05:33+5:302021-07-12T04:05:33+5:30

पर्यटन संचालनालयाचा ऑनलाइन उपक्रम लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील खाद्यसंस्कृती आणि पाककलेला चालना देतानाच देश-विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित ...

‘Masterchef of Maharashtra’ competition to promote food culture | खाद्य संस्कृतीला चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ स्पर्धा

खाद्य संस्कृतीला चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ स्पर्धा

Next

पर्यटन संचालनालयाचा ऑनलाइन उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील खाद्यसंस्कृती आणि पाककलेला चालना देतानाच देश-विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाने ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ या ऑनलाइन रेसीपी स्पर्धेचे आयोजन केले आहे, अशी माहिती पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली.

राज्याच्या विविध भागातील मालवणी, आग्री-कोळी, खान्देशी, कोल्हापुरी, वऱ्हाडी अशा विविध खाद्यसंस्कृती लोकप्रिय आहेत. पर्यटक महाराष्ट्रात आल्यानंतर स्थानिक खाद्यपदार्थांचा आवर्जून आस्वाद घेतात. आता महाराष्ट्रातील अशा विविध रेसिपी देश आणि जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचवून त्यांना चालना देण्यात येणार आहे. यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्या अनुषंगानेच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्याच्या विविध भागातील पाककला प्रेमींनी सहभागी होऊन महाराष्ट्राचे मास्टरशेफ बनावे, असे आवाहन संचालक सावळकर यांनी केले आहे.

स्पर्धेत सहभागासाठी आपल्या आवडत्या महाराष्ट्रीय डिशची व्हिडिओ रेसिपी ऑनलाईन सबमिट करावयाची आहे. ११ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा असेल. सहभागींनी किमान ३० सेकंद आणि कमाल १५ मिनिटांची व्हिडिओ रेसिपी ऑनलाईन सबमिट करायची आहे. अभिनव सादरीकरण, प्रादेशिक महाराष्ट्रीय रेसीपी, महाराष्ट्रीय पदार्थांचा वापर, आरोग्यदायी ठेवण्यासाठी काळजी आदी बाबींच्या आधारे विजेत्यांची निवड केली जाईल. तज्ज्ञ शेफ्सच्या समितीमार्फत विजेत्यांची निवड केली जाणार आहे.

स्पर्धेतील १५ सर्वोत्कृष्ट रेसिपींना प्रत्येकी दहा हजार रुपये, ४० रेसिपींना प्रत्येकी पाच हजार रुपये तर उत्कृष्ट शंभर रेसिपींना प्रत्येकी दोन हजार रुपयांची बक्षिसे दिली जातील. शिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाकडून सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर इत्थंभूत माहिती उपलब्ध आहे. https://bit.ly/MaharashtracheMasterchef या लिंकवर माहिती तसेच अर्ज उपलब्ध आहे.

Web Title: ‘Masterchef of Maharashtra’ competition to promote food culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.