Join us

मस्तीखोर ड्रोगन, लाजाळू पिंटो ठरणार राणीबागेचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:25 AM

मुंबई : काही दिवसांपूर्वी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई उद्यानात आलेले ड्रोगन आणि पिंटो चांगलेच रुळू लागले आहेत. त्यात एक ...

मुंबई : काही दिवसांपूर्वी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई उद्यानात आलेले ड्रोगन आणि पिंटो चांगलेच रुळू लागले आहेत. त्यात एक मस्तीखोर तर दुसरी लाजाळू अशी या दोन बिबट्यांची जोडी लवकरच राणीबागेचे आकर्षण ठरणार आहे. तत्पूर्वी राणीबागेचा मस्त पाहुणचार घेत दोघे मांसाहार करीत आहेत.

नूतनीकरणाच्या अंतिम टप्प्यात राणीबागेत प्राण्यांचे १७ पिंजरे उभारण्यात येत आहेत. दोन वर्षांपूर्वी आणलेले हेम्बोल्ट जातीचे पेंग्विन बच्चेकंपनीचे लाडके झाले आहेत. त्यानंतर आता बाराशिंगा, बिबट्या आणि लांडग्यांची जोडी आणण्यात आली आहे. मेंगलोरहून आलेल्या बिबट्यांच्या जोडीला सध्या वेगळे ठेवण्यात आले आहे. मुंबईच्या वातावरणात त्यांनी रुळावे यासाठी महिनाभरानंतरच त्यांना पर्यटकांसमोर आणण्यात येणार आहे.मेंगलोर येथून २४ एप्रिल रोजी बिबट्या आणि लांडग्यांच्या जोडीला रस्तेमार्गे मुंबईत आणण्यात आले. पण २४ तारखेच्या रात्री प्राण्यांसह निघालेली ही गाडी मोठा प्रवास करून २८ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता राणीबागेत पोहोचली.असे भेटले ड्रोगन-पिंटोकर्नाटक वन अधिकाऱ्यांना बिबट्याचे दोन बछडे जंगलात सापडले होते. त्यांनी मेंगलोर येथील पिलीकुला प्राणिसंग्रहालयात त्यांना आणले तेव्हा हे बछडे अवघे दोन आठवड्यांचे असल्याने नाजूक प्रकृतीचे होते. पण यातील मादी वाचली नाही. ड्रोगनच्या तब्येतीत मात्र हळूहळू सुधारणा झाली. गेम आॅफ थ्रोन्स या प्रसिद्ध मालिकेवरून त्याला ‘ड्रोगन’ नाव ठेवण्यात आले. तर ‘पिंटो’ही अशीच जंगलात बेवारस सापडली होतीअसे आहेत दोन बिबटे : चपळ व आक्रमक असलेला हा प्राणी दिसायला रूबाबदार आहे. तीन वर्षांचा ड्रोगन मस्तीखोर आहे, तर पाच वर्षांची पिंटो लाजाळू आहे. त्यांना दररोज साडेतीन किलो बीफ आणि चिकन खाण्यास देण्यात येते. पण दोघांच्या आहाराचे प्रमाण जाणून घेण्यासाठी त्यांना स्वतंत्र जेवायला दिले जाते.