Join us

दादर चौपाटीवर माता रमाई आंबेडकर व्ह्युविंग डेक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 11:40 AM

या पर्यटनस्थळाचे नामकरण ‘माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्ह्युविंग डेक’ असे करण्याचे निर्देश पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. या डेकवर तीनशे पर्यटक उभे राहू शकतील, तर शंभर बसू शकतील. 

मुंबई: पर्यटकांचे प्रमुख प्रेक्षणीय स्थळ असलेली दादर चौपाटी आता आणखी आकर्षक बनली आहे. पावसाचे पाणी वाहून समुद्रात नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्या खात्याच्या पातमुखावर दहा महिन्यांच्या कालावधीत महापालिकेने ‘व्ह्युइंग डेक’ उभारले आहे. या गॅलरीत उभे राहून मुंबईकरांना समुद्रातील भरती- आहोटी तसेच वरळीपासून वांद्रेपर्यंतचा समुद्राचे विहंगमय दर्शन घडणार आहे. 

या पर्यटनस्थळाचे नामकरण ‘माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्ह्युविंग डेक’ असे करण्याचे निर्देश पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. या डेकवर तीनशे पर्यटक उभे राहू शकतील, तर शंभर बसू शकतील. 

 आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या गॅलरीचे बुधवारी लोकार्पण करण्यात आले. चैत्यभूमीजवळ असणाऱ्या या पर्यटनस्थळाचे नामकरण ‘माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्ह्युविंग डेक’ असे करण्याचे निर्देश त्यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. या स्थळाच्या धर्तीवर मुंबईतील इतर पातमुखांवर देखील ‘व्ह्युइंग डेक’ उभारण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

असा आहे व्ह्युविंग डेक...- डेकची उंची समुद्रापासून सुमारे दहा फूट असून, क्षेत्रफळ १०,००० चौरस फूट आहे.- दहा महिन्यांच्या विक्रमी कालावधीत २६ पिलर्सवर बांधकाम पूर्ण. - डेकवर अत्याधुनिक व ऊर्जा बचत करणाऱ्या ‘एलईडी’ दिव्यांची आकर्षक प्रकाशयोजना.- दादर व सभोवतालच्या परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा या डेकखाली असणाऱ्या पर्जन्य जलवाहिनीच्या पातमुखातून समुद्रात करण्यात येतो.- एकावेळी ३०० पर्यटक उभे राहू शकतात. किमान शंभर लोकांना बसता यावे, यासाठी या ठिकाणी २६ बाक ठेवण्यात आले आहेत. आठ ठिकाणी वैविध्यपूर्ण आकाराची आसनव्यवस्था करण्यात आली आहे.- विविध प्रकारची १३० झाडे लावण्यात आलेली आहेत.  

टॅग्स :मुंबईआदित्य ठाकरे