व्हॉट्सअपवर मॅचफिवर; अनुष्का टार्गेट
By admin | Published: March 26, 2015 11:56 PM2015-03-26T23:56:19+5:302015-03-26T23:56:19+5:30
वर्ल्डकप सेमीफायनल्सचा सामना जसजसा रंगात आला, तसे व्हॉट्सअप आणि सोशल नेटवर्किंग साइ्टसवर मेसेजे्सला उधाण आले.
मुंबई : वर्ल्डकप सेमीफायनल्सचा सामना जसजसा रंगात आला, तसे व्हॉट्सअप आणि सोशल नेटवर्किंग साइ्टसवर मेसेजे्सला उधाण आले. एका बाजूला इंडिया-आॅस्ट्रेलिया सेमी फायनल्स रंगत असताना दुसऱ्या बाजूला मात्र ‘बिच्चारी’ अनुष्का शर्मा टार्गेट होत होती. व्हॉट्सअपवर आणि सोशल नेटवर्किंग साइ्टसवर सेमी फायनलच्या मॅच तडका देऊन अनेक मेसेजेस् आणि कोपरखळ््यांचा नुसता धुमाकुळ सुरु आहे.
सेमीफायनल सुरु होण्यापूर्वी व्हॉट्सअपकरांमध्ये धम्माल सुरु होती.‘मैने सुना है..प्यार करनेवालो की नींद उड जाती है.. जिनकी भी उडी हो, मुझे कल सुबह जल्दी उठा देना सेमी फायनल है...’ या मेसेजपासून झाली. तर त्यानंतरही ‘पूर्ण होवो साऱ्या इच्छा ...सेमी फायनलच्या हार्दिक शुभेच्छा’ म्हणत डोकेबाज व्हॉट्सअपकरांनी हा मेसेजही शेअर केला. शिवाय, व्हॉट्सअपवर सेमीफायनलच्या मॅचचा तिकिटाचा फोटोही शेअर झाला.
सेमी फायनल पाहण्यासाठी आतुर असलेल्यांसाठी ‘रात्री सिडनीला जायला विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत,तरी प्रवाशांनी नोंद घ्यावी’ या मेसेजने धम्माल उडविली.
मॅच पुढे रंगात येऊ लागल्यावर ‘अगर विराट कोहलीने सेमीफायनल मे अपने बल्ले का कमाल दिखाता तो, अनुष्का शर्मा को राष्ट्रीय भाभी घोषित किया जाएगा’ असा मेसेज सर्वत्र फिरु लागला.
‘अनुष्का विराटचा एक रन पाहण्यासाठी सिडनीपर्यंत गेली, याला म्हणतात खरे प्रेम’ या मेसेजने तरुणाईमध्ये एकच कल्ला केला.
काही जागृक व्हॉट्सअपकरांनी ‘आज भारत मॅच हरला तर..कृपया खेळाडूंचा सन्मानच करा. त्यांच्या विरोधात जाळपोळ, शिवीगाळ, इमेज, व्हिडिओ अशा चुकीच्या गोष्टींचा प्रसार करु नका. अशाने त्यांचा अपमान तर होईलच परंतु एक भारतीय म्हणून आपण आपल्याच लोकांप्रती काय भावना ठेवतो यांचे प्रदर्शन होईल. तेव्हा खेळाला खिलाडूवृत्तीनेच घ्या. देशाची मान झुकेल असे काही करणार नाही आणि कुणाला करु देणार नाही’ हा मेसेज शेअर झाला. यामुळे पुन्हा एकदा इंडियाचे खेळाडू ‘बाजीगर’ ठरले.