Join us

गणेश पूजनाचे साहित्य थेट देवघरात; विलेपार्लेत 'उबाटा'चा अभिनव उपक्रम

By मनोहर कुंभेजकर | Published: September 15, 2023 6:16 PM

गणराया भक्तिभावाने स्वागत करण्यासाठी विलेपार्ले शिवसेनेने पार्लेकरांच्या घरात पूजेचे साहित्य  हा  अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

मुंबई : गणराया भक्तिभावाने स्वागत करण्यासाठी विलेपार्ले शिवसेनेने पार्लेकरांच्या घरात पूजेचे साहित्य  हा  अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. विलेपार्ले शिवसेनेच्या (उबाटा)च्या माध्यमातून  गणेश पूजनाला लागणारे  विविध २१ प्रकारच्या पूजेचे साहित्य यांचा संच असलेला बॉक्सचे विलेपार्ले व अंधेरी मधील प्रत्येक घरात वाटप करण्यात येत आहे.

माजी परिवहनमंत्री, आमदार अँड.अनिल परब यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ त्यांच्या वांद्रे पूर्व गांधीनगर येथील निवासस्थानी करण्यात आला. या उपक्रमासाठी शिवसेना शाखा क्रमांक शिवसेनेचे विलेपार्लेचे विधानसभा समन्वयक व आयोजक नितीन डीचोलकर  यांनी ही माहिती दिली. गेली  15 वर्ष या अभिनव उपक्रमाचे आयोजन करत असल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी महिला विधानसभा संघटिका रूपाली शिंदे,उपविभागप्रमुख चंद्रकांत पवार, उपशाखाप्रमुख नरेश खोत, सुरेश कदम,  कार्यालयप्रमुख जितेंद्र शिर्के व राम जाधव उपस्थित होते. 

टॅग्स :मुंबईउद्धव ठाकरेअनिल परब