Join us

माथाडी कामगारही रमले गणोशभक्तीत

By admin | Published: September 03, 2014 1:19 AM

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील व्यापारी व माथाडी कामगारही गणोश भक्तीमध्ये व्यस्त असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील व्यापारी व माथाडी कामगारही गणोश भक्तीमध्ये व्यस्त असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. प्रत्येक मार्केटमध्ये सार्वजनीक गणोश उत्सव साजरा करण्यात येत असून उत्सवाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्यात येत आहे. 
आशीया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीची ओळख आहे. वर्षाला साडेबारा हजार कोटीची उलाढाल येथील विविध बाजारपेठांमध्ये होत असून जवळपास 1 लाख नागरिकांना रोजगार प्राप्त झाला आहे. माथाडी कामगार मोठय़ा उत्साहात गणोश उत्सव साजरा करत असतात. 
कांदा बटाटा मार्केटमध्ये अण्णासाहेब पाटील सांस्कृतीक सेवा मंडळ 35 वर्षापासून सार्वजनीक गणोश उत्सव साजरा करत आहे. व्यापारी, कामगार व इतर सर्व घटक यामध्ये सहभागी होत आहे. या ठिकाणी प्रत्येक वर्षी समाजप्रबोधनात्मक देखावा दाखविला जातो. यावर्षी महाराष्ट्रातील समाजसेवेची परंपरा दाखविण्यात आली  असून देखावा पाहण्यासाठी गणोश भक्त गर्दी करत आहेत.  मसाला मार्केटमध्ये अण्णासाहेब पाटील सार्वजनीक गणोश उत्सव मंडळाच्या वतीने 24 वर्षापासून गणोश उत्सवाचे आयोजन केले जात आहे. या ठिकाणी अत्यंत साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात येतो. उत्सवामध्ये विविध सामाजीक उपक्रम राबविले जात आहेत.  धान्य, भाजी व फळ मार्केटमध्येही उत्सवाचे आयोजन केले आहे. दिवसभर गोणी वाहन्याचे काम करणारे माथाडी कामगार काम संपले की गणरायाच्या सेवेस वेळ देत आहेत. कष्टक:यांच्या उत्सवाला शहरातील गणोश भक्तही मोठय़ाप्रमाणात भेट देत आहेत. (प्रतिनिधी)