Join us

पर्यटकांना खुणावतेय माथेरान

By admin | Published: June 29, 2015 4:04 AM

माथेरान येथे नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते, मात्र आता पावसामुळे येथे तयार झालेल्या धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे.

माथेरान : पावसाळा सुरू झाल्याने सर्वांना वेध लागले ते चिंब पावसात भिजण्याचे आणि निसर्गसौंदर्यासह धबधब्यांचा आनंद लुटण्याचे. यासाठी डोंगराच्या पायथ्याशी जेथे धबधबे असतील तेथे नागरिकांची गर्दी पाहावयास मिळत आहे. माथेरान येथे नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते, मात्र आता पावसामुळे येथे तयार झालेल्या धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे.एक दिवस का होईना मगरळ दूर क रून क्षीण झालेल्या शरीराला सुखद गारवा मिळवून देण्यासाठी वर्षासहलीकडे सर्वांचाच ओढा आहे. सर्वांच्या खिशाला परवडणारे मुंबई-पुण्यापासूनचे अगदी जवळचे निसर्गाशी साधर्म्य साधणारे एकमेव पर्यटनस्थळ म्हणजे माथेरान. येथे पावसाळ्यात वर्षासहलीसाठी विशेषत: शनिवार, रविवार या सुटींच्या दिवशी चिंब भिजण्यासाठी, मौजमस्ती करण्यासाठी दोन दिवस माथेरानला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. येथे शार्लेट तलावाचे ओसंडून वाहणारे पाणी तर पंधरा फुटांवरून वाहणारे धबधबे याचा आनंद येथे लुटता येतो.पावसाळ्यात घाटरस्त्यातून नेरळहून पायी येणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असते. जसजसे घाटरस्त्यातून आपण वरवर येतो तसतसे पावसाचे शीतल तुषार, दाट धुके यांचा अनुभव घेता येतो. तर समोर दिसणारा तीन हजार फूट उंचीचा महाकाय डोंगर जणू आपल्याशी संवाद साधत असल्याचे येथून जाताना भासते. झऱ्यांचे खळखळणारे पाणी, हिरवाईने नटलेले डोंगर हे निसर्गसौंदर्य पाहून पर्यटकांना भुरळ पडते. त्यामुळे येथील सौंदर्य पाहण्यासाठी सध्या पर्यटकांची गर्दी होत आहे. यात तरुणांची संख्या अधिक आहे.(वार्ताहर)निसर्ग सौंदर्याची लुटा मजामाथेरानच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या दस्तुरी नाक्यापुढे अमन लॉज रेल्वे स्टेशन आहे. तेथून ठरावीक वेळामध्ये शटलसेवा माथेरान स्थानकापर्यंत नेण्यास मदत करते. पुढे आल्यानंतर पॉइंट फिरवण्यासाठी घोड्याची सफर अथवा पायी फिरता येते.