माथेरान : येथील विपुल वनराई दिवसेंदिवस कमी होत असल्याने याचा विपरीत परिणाम पर्यटन व्यवसायावर होणार आहे. त्यामुळे स्थानिकांच्या व्यवसायावर याची गदा येणार आहे. यासाठी ही वनसंपदा वाचविण्याकरिता सर्वपक्षीय कार्यकर्ते संघटित झाले आहेत. त्यासाठी नुकतीच येथील o्रीराम मंदिरात या संबंधी एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, नगरसेवक शिवाजी शिंदे, उपनगराध्यक्ष राजेश दळवी, दिनेश सुतार, प्रदीप घावरे, भाजपाचे अध्यक्ष वसंत कदम, माजी नगरसेवक कुलदीप जाधव, o्रमिक हातरिक्षा संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, संतोष शिंदे, आरपीआय अध्यक्ष अनिल गायकवाड यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
माथेरानची खरी ओळख इथली हिरवीगार, गर्द, वनसंपदा हीच आहे. माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर आलेल्या गर्द झाडांच्या जागी सध्या मोकळे मैदान झालेले आहे. या ठिकाणी परिसरातील घोडेवाल्यांचा वावर असून घोडय़ांच्या मलमूत्र विसजर्नाने आणि घोडय़ांनी झाडाची साल खाल्ल्याने आजवर शेकडो झाडे मृत झाल्याने जंगलाच्या भागाला मैदानाचे रूप आलेले आहे. याबाबतीत ग्रामस्थांनी अनेकदा नगरपरिषद, वनविभागाला निवेदने दिलेली आहेत. नगरपरिषदेत या ठिकाणावरील घोडे इतरत्र हलविण्याबाबत ठरावही दाखल केलेला आहे. पोलीस आणि प्रशासनही याबाबत कारवाई करण्यात निष्क्रिय ठरल्याचेच समोर आले आहे. दस्तुरी नाक्यावर परिसरातील घोडेवाले व्यवसाय करतात, त्यांना फक्त धंदा एके धंदा करायचा असतो. त्यांना काही लाईट बिल, पाणी बिल भरायचे नसते. गावाविषयी काहीही प्रेम नाही, सहानुभूती नाही. या लोकांना इथल्याच स्थानिकांनी आपले तबेले भाडय़ाने दिलेले आहेत. वनविभागाच्या अधिका:यांना वेळोवेळी सूचित करुन ते काहीही दखल घेत नाहीत. यामध्ये आर्थिक व्यवहार होत असल्याचेही नागरिकांमधून बोलले जात आहे.
पर्यटकांकडून घोडेवाले अव्वाच्या सव्वा रक्कम आकारुन पर्यटकांची फसवणूक करुन जवळचेच छोटेसे पॉईंट दाखवून दिशाभूल करतात, असे नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी स्पष्ट केले, तर वनसंरक्षण समितीचे स्थानिक सदस्य असताना तक्रारीबाबत वनपाल गांभीर्याने घेत नाहीत, त्यासाठी सर्व वनसंरक्षण समितीच्या सदस्यांनी राजीनामा दिल्यास वरिष्ठार्पयत संदेश जाईल, असे नगरसेवक दिनेश सुतार यांनी नमूद केले. (वार्ताहर)
माथेरानकरांनी आता वेळ दवडायला नको. आपापसातील हेवेदावे विसरुन संघटित व्हायला पाहिजे. मूठभर लोक माथेरानची वनसंपदा नष्ट करु पाहत आहेत. त्यांना आवर घातला पाहिजे, गाव वाचले पाहिजे. स्थानिकांच्या अर्थकारणावर परिसरातील लोक घाला घालत आहेत. सिपसन टँक येथील जंगल देखील नष्ट केले आहे. आता सर्वानी संघटित होऊन तीव्र आंदोलन करण्याची गरज आहे. मतांचे कुणी राजकारण करु नये.
- मनोज खेडकर, माजी नगराध्यक्ष