मुंबई : उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेनेतील उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसैनिकांच्या विरोधामुळे भाजपच्या किरीट सोमय्या यांची उमेदवारी रखडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट मिळावी, यासाठी सोमय्या प्रयत्नशील आहेत. मात्र, उद्धव यांनी भेट नाकारून सोमय्यांसाठी मातोश्रीचे दरवाजे बंद असल्याचे संकेत दिले आहेत.महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान किरीट सोमय्या यांनी शिवसेना आणिशिवसेना नेतृत्वावर खालच्या पातळीवरजात भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यामुळेस्थानिक शिवसैनिकांचा सोमय्यांच्याउमेदवारीवर आक्षेप आहे. ‘एकच स्पीरिट, नो किरीट’ अशी नारेबाजीही शिवसैनिकांनी सुरू केली आहे.ठाकरे यांनी भेट नाकारल्यानंतर सोमय्यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून शिष्टाईसाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही शिवसेना नेत्यांची भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. लाड लोकसभेसाठी इच्छुक आहेत, त्यासाठीच ते मातोश्रीवर दाखल झाल्याची चर्चा आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, भाजप नेते मनोज कोटक, प्रवीण छेडा आदी नावांमध्ये आता लाड यांच्या नावाचा समावेश झाल्याने उलटसुलट चर्चा रंगत आहेत.मातोश्री भेटीबाबत लाड म्हणाले की, युतीबाबतच्या काही कामांसाठी मी येथे आलो होतो. सोमय्यांच्या उमेदवारीबाबत उद्धव ठाकरे, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस अंतिम निर्णय घेतील.युतीत कसलाच तणाव अथवा मतभेदनाहीत. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल.सोमय्यांच्या उमेदवारीवरून सुरू असलेले नाट्य आणखी काही दिवस चालेल असेदिसते आहे. या मतदारसंघाबाबतशेवटच्या टप्प्यात निर्णय होण्याची शक्यताआहे. दरम्यान, शिवसेना आमदार सुनीलराऊत यांनी सोमय्यांच्या विरोधातनिवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. मात्र, राऊत यांचे विधान पक्षाची अधिकृत भूमिका नाही, असे शिवसेनेतील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
किरीट सोमय्यांसाठी ‘मातोश्री’चे दरवाजे बंदच, उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 4:30 AM