भाडेकरूंना मिळणार चटई क्षेत्रफळाचे प्रमाणपत्र

By admin | Published: January 13, 2016 01:57 AM2016-01-13T01:57:06+5:302016-01-13T01:57:06+5:30

मोडकळीस आलेल्या इमारतींमधील सदनिकाधारक तसेच भाडेकरूंना त्यांंच्या घराचे चटई क्षेत्रफळाचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे़ त्यामुळे घर सोडल्यानंतर

The Matrix area area certificate will be available to the tenants | भाडेकरूंना मिळणार चटई क्षेत्रफळाचे प्रमाणपत्र

भाडेकरूंना मिळणार चटई क्षेत्रफळाचे प्रमाणपत्र

Next

मुंबई : मोडकळीस आलेल्या इमारतींमधील सदनिकाधारक तसेच भाडेकरूंना त्यांंच्या घराचे चटई क्षेत्रफळाचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे़ त्यामुळे घर सोडल्यानंतर फसवणूक होण्याच्या भीतीने धोकादायक इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या रहिवाशांना दिलासा मिळाला आहे़
घर सोडल्यानंतर घरावरील हक्क जाण्याच्या भीतीने रहिवासी स्थलांतरित होत नाहीत़ त्यामुळे अशा शेकडो धोकादायक इमारती रिकाम्या करून घेण्यात पालिकेला अनंत अडचणींचा सामना करावा लागत असतो़ मात्र पावसाळ्यात कोसळण्याचा धोका अधिक असल्याने पालिकेला टीकेचे धनी व्हावे लागत आहे़
एप्रिल महिन्यात सर्व धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण करून मे महिन्यापासून कारवाईला सुरुवात होईल़ सदनिकाधारक आणि भाडेकरूंना ते राहत असलेल्या घराच्या चटई क्षेत्रफळाचे प्रमाणपत्र देण्याचा समावेश या नियमावलीत करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

सी १ श्रेणीतील इमारती रिकाम्या करण्याची आवश्यकता असते़
या इमारती रिकाम्या करण्यापूर्वी भाडेकरू, सदनिकाधारकांना असे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे़
मात्र त्यानंतरही इमारत खाली न केल्यास तेथील वीज व पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल़
पालिकेच्या मालकीच्या इमारतीमधील रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करून त्यानंतर इमारत पाडणे़
धोकादायक खाजगी इमारतीतील रहिवाशांच्या स्थलांतराची जबाबदारी पोलिसांवर असेल़

Web Title: The Matrix area area certificate will be available to the tenants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.