मॅटने वैध ठरविलेल्या पीएसआयना पोस्टिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 05:50 AM2018-12-05T05:50:20+5:302018-12-05T05:50:29+5:30

परीक्षा व खडतर प्रशिक्षणात उत्तीर्ण झाल्यानंतरही, पद मिळविण्यासाठी न्यायालयीन संघर्ष करावा लागणाऱ्या मागासवर्गीय पीएसआयना अखेर पोस्टिंग मिळाले आहे.

Matte posting validated PSINA | मॅटने वैध ठरविलेल्या पीएसआयना पोस्टिंग

मॅटने वैध ठरविलेल्या पीएसआयना पोस्टिंग

Next

मुंबई : परीक्षा व खडतर प्रशिक्षणात उत्तीर्ण झाल्यानंतरही, पद मिळविण्यासाठी न्यायालयीन संघर्ष करावा लागणाऱ्या मागासवर्गीय पीएसआयना अखेर पोस्टिंग मिळाले आहे. मुंबईत नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या वीस अधिकाºयांना विविध पोलीस ठाण्यात नियुक्ती दिली आहे. आयुक्त सुबोध जायसवाल यांनी सोमवारी याबाबत आदेश बजावले.
पोलीस विभागात २०१६ साली झालेल्या पीएसआयच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या १५४ मागासवर्गीय उमेदवारांना आरक्षणातून पदोन्नती मिळाल्याचा निकष काढून, त्यांना पुन्हा मूळ पदावर पाठवले. गृहविभागाने दिलेल्या चुकीच्या अभिप्रायामुळे मॅटने त्याबाबतचे आदेश दिले होते. नाशिक अकादमीत दीक्षान्त सोहळा झाल्यानंतर त्यांना अपात्र ठरवले होते. विभागाच्या अन्यायाबद्दल संबंधितांनी पुन्हा मॅटमध्ये दाद मागितली. ‘लोकमत’ने हा विषय लावून धरला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संबधित पीएसआय हे परीक्षेतून उत्तीर्ण झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर, गृहविभागाने त्याबद्दल शपथपत्र दाखल केल्यानंतर, मॅटने पूर्वीचा आदेश रद्द केला. २१ नोव्हेंबरला १५४ जणांना प्रशिक्षण पाठविण्याचे आदेश महासंचालकांनी बजावले. त्यानुसार, २० उमेदवारांची मुंबईत निवड झाली होती. मात्र, गेले १५ दिवस त्यांना नियुक्ती न दिल्याने बसून होते. अखेर या अधिकाºयांना सोमवारी नियुक्ती दिल्याचे नोटीस जारी करण्यात आली.

Web Title: Matte posting validated PSINA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस