Coronavirus : भायखळ्यापाठोपाठ माटुंगा पोलीस इमारत सील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 10:59 PM2020-04-16T22:59:05+5:302020-04-16T23:01:33+5:30

Coronavirus : बिल्डिंगमध्ये रहात असलेले अंमलदार व अधिकारी यांना नोकरीच्या ठिकाणी न जाण्याची सूचना केली आहे.

The Matunga Police Building seals after byculla pda | Coronavirus : भायखळ्यापाठोपाठ माटुंगा पोलीस इमारत सील

Coronavirus : भायखळ्यापाठोपाठ माटुंगा पोलीस इमारत सील

Next
ठळक मुद्देपुर्ण वसाहत 'क्वारंटाटाईन झोन' करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.तातडीने त्याच्या संपर्कात असलेल्या पोलिसांची तपासणी करून त्यांना क्वारटाईन करण्यात आले.

मुंबई : मुंबईतील कोरोनाचा कहर आता खाकी वर्दीवाल्याच्या घरात शिरला आहे. भायखळा आणि माटूंगा पोलीस वसाहतीत प्रत्येकी  एक पॉजिटीव्ह रुग्ण आढळला आहे. त्यामुळे भायखळा पाठोपाठ  माटुंगा पोलीस लाईनीतील संबंधित  पूर्ण इमारत सील करण्यात आली आहे.बिल्डिंगमध्ये रहात असलेले अंमलदार व अधिकारी यांना नोकरीच्या ठिकाणी न जाण्याची सूचना केली आहे. 


याप्रकारामुळे संबंधित अधिकारी, अंमलदार आणि त्याच्या कुटूंबीयाच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग इतर कोणाला होऊ नये,यासाठी पुर्ण वसाहत 'क्वारंटाटाईन झोन' करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.


दक्षिण मुंबईतील मध्य व वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या भायखळा पोलीस वसाहतीत राहणाऱ्या एका पोलिसांचा सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. त्यानुसार तातडीने त्याच्या संपर्कात असलेल्या पोलिसांची तपासणी करून त्यांना क्वारटाईन करण्यात आले. त्याचा बरोबर त्या इमारती रहात असलेल्या सर्वांची तपासणी करण्यात आले. सर्वांना घरात थांबून रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आता खार पोलीस ठाण्यात नियुक्तीला असलेल्या एका कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याच्या आईवडिलांचेही तपासणी करण्यात आली आहे.  ते रहात असलेली संबंधित इमारत  क्वारंटाइन करून सील केली आहे. त्याठिकाणी 20 ते 22 पोलीस कुटुंबे रहात आहेत. तेथील विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी, अंमलदार यांना त्याच्या नियुक्तीच्या ठिकाणी जाता येणार नाही, याची नोंद माटूंगा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तेथून संबंधित ठिकाणी निरोप दिला जाणार आहे.

 

खबरदारीसाठी इमारत  सील
कोरोनाचाची बाधा इतरांना होऊ नये, व्हायरस पसरु नये यासाठी भायखळा व माटूंगा  पोलीस वसाहतीतील संबंधित इमारत सील केली आहे. संबंधितानी घाबरन्याचे कारण नाही,त्यांच्या सुरक्षची जबाबदारी घेण्यात येत आहे.  - प्रणव अशोक (पोलीस उपयुक्त प्रवक्ते)

Web Title: The Matunga Police Building seals after byculla pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.