मुंबईसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापना करण्याची गरज-लोढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 02:36 AM2017-07-29T02:36:58+5:302017-07-29T02:37:05+5:30
देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईचा सुनियोजित विकास, सुविधांचा विस्तार आणि रोजगार वाढविण्याकरिता मुंबईसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणे गरजेचे आहे
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईचा सुनियोजित विकास, सुविधांचा विस्तार आणि रोजगार वाढविण्याकरिता मुंबईसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणे गरजेचे आहे, असे म्हणणे भारतीय जनता पार्टीचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी शुक्रवारी विधानसभेत मांडले. यासाठी त्वरीत एक समिती स्थापन करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
एमएमआरडीए, सिडको, म्हाडा, एसआरए, महानगरपालिका, एमएसआरडीसी असे अनेक सरकारी उपक्रम आहेत. ज्यांचा परस्पर ताळमेळ नाही. परिणामी मुंबईच्या विकासाला खीळ बसली आहे.
यावर जलद गतीने तोडगा काढण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात यावी, असे म्हणणे मंगल प्रभात लोढा यांनी मांडले.
मुंबईच्या विकासाच्या समन्वयासाठी समिती काम करेल; आणि स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा प्रकियेतही अग्रभागी राहील, असेही लोढा म्हणाले.
दरम्यान, मोठया प्रमाणावरील करप्रणालीमुळे उद्योग राज्याबाहेर गेले आहेत.परिणामी सरकारने संबंधितांवर लादलेला कर कमी करावा, असेही लोढा यावेळी म्हणाले.