'मावा'ची आंतर-महाविद्यालयीन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:07 AM2021-02-11T04:07:19+5:302021-02-11T04:07:19+5:30

मुंबई मेन अगेन्स्ट व्हायलन्स ॲण्ड अब्युस (मावा) या संस्थेने 'युवा अभिव्यक्ती २०२१' या दोन दिवसीय आंतर-महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धांचे विनामूल्य ...

Mawa's inter-college competition | 'मावा'ची आंतर-महाविद्यालयीन स्पर्धा

'मावा'ची आंतर-महाविद्यालयीन स्पर्धा

Next

मुंबई

मेन अगेन्स्ट व्हायलन्स ॲण्ड अब्युस (मावा) या संस्थेने 'युवा अभिव्यक्ती २०२१' या दोन दिवसीय आंतर-महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धांचे विनामूल्य आयोजन केले आहे. २० व २१ फेब्रुवारी रोजी ऑनलाइन माध्यमाद्वारे होणाऱ्या या स्पर्धेत 'विषारी मर्दानगी' या विषयावर निबंध स्पर्धा, पथनाट्य, घोषवाक्य, समूह गायन, वक्तृत्व, भिंतीचित्र व लघुपट निर्मिती स्पर्धांचे आयोजन आले आहे. समाजात असलेली विषारी मर्दानगी आणि त्यातून होत असलेली हिंसा व अत्याचार थांबवून एक हिंसामुक्त समृद्ध समाज निर्माण होण्याच्या अनुषंगाने युवकांचे कलाविष्कार सादर व्हावेत, या हेतूने या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. मुंबई विद्यापीठ, एस.एन.डी.टी.; तसेच इतर विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी या सहभागी होऊ शकतील. स्पर्धेसाठी yuva.abhivyakti123@gmail.com या इ-मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.

Web Title: Mawa's inter-college competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.