मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात २६ ते २९ एप्रिलदरम्यान कमाल तापमानाचा पारा वाढणार आहे. त्यामुळे उन्हाळ्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना आता पुन्हा उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार असून, मुंबईचे कमाल तापमान ३८ अंशाच्या आसपास नोंदविले जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मुंबईत बुधवारी हवामान उष्ण, दमट राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४ आणि २५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. उत्तर कोकणात तुरळक उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडेल.- मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग
गेल्या आठवड्याच्या तुलनेत यावेळी येणारी उष्णतेची लाट कमी दाहकता देणारी असली तरी तापमान चढे राहील. हवामान उष्ण असेल. आर्द्रता अधिक राहील. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, बदलापूर आणि कर्जतमधील कमाल तापमान ४० अंशांवर जाईल. मुंबईचे तापमान ३७-३८ अंश राहील.- अथ्रेया शेट्टी, हवामान अभ्यासक